24 कॅरेट ‘गोल्डन मोदक’कधी पाहिलाय?, सोन्याचा वर्ख असलेल्या या मोदकाचा थाटच न्यारा
नाशिकमधील सागर स्वीट्समध्ये २५ हून अधिक प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार मोदक, तसेच अनेक विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. सोने आणि चांदीने सजवलेले गोल्डन मोदक हे या दुकानातील सर्वात लोकप्रिय मिठाईंपैकी एक आहेत.

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवाची सुरुवात झाली असून गणपती बाप्पा अनेक जणांच्या घरात मुक्कामाला आले आहेत. बाप्पाला नैवेद्य प्रिय असतो. त्यामुळे नाशिक येथील एका मिठाईच्या दुकानात गणेश चतुर्थी निमित्त एक अनोखी ऑफर सादर झाली आहे. येथील गोल्डन मोदकाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या गोल्डन मोदकाची किंमत २७ हजार रुपये प्रति किलोग्रॅम ठेवण्यात आली आहे. या गोल्डन मोदकावर सोन्याचा वर्ख चढवण्यात आले आहे. सागर स्वीट्सच्या प्रिमियम मिठाई आणि मोदकची चर्चा संपूर्ण शहरात आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या जोशात साजरा केला जातो. लोक १० दिवस बाप्पाचा पाहुणचार करतात.या दहा दिवसात बाप्पाला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य दाखवतात. अशात नाशिकच्या सागर मिठाई दुकानात २५ हून अधिक अनोखे आणि हाय क्वालिटीचे मोदक तयार केले आहेत.या मोदकांवर ऑफर देखील आहेत.
सोने आणि चांदीने सजलेल्या गोल्डन मोदक मिठाईच्या दुकानाची चर्चा सुरु आहे. गोल्डन मोदकची किंमत २७,००० प्रति किलो आहे. काजू मोदक २००० रुपये किलोने विकला जात आहेत. परंतू या गोल्डन मोदकाची चर्चा सर्वाधिक आहे. दुसऱ्या व्हरायटीमध्ये ड्राय फ्रुट, ऑरेंज, आणि मलाई मोदकाचा समावेश आहे.मोदकाच मोठी व्हरायटी आहे.
बाजारात अनोखे स्वादाचे मोदक
या शिवाय, यंदा बाजारात मोदक चवीमध्ये एक मोठा प्रयोगही पाहायला मिळतो. जयपूर आणि मुंबईमधील अनेक दुकानांमध्ये मोदकांची एक विशेष श्रेणी उपलब्ध आहे. या श्रेणीमध्ये मँगो सिगार, मथुरा पेडा, कोकोनट, रोझ गुलकंद, थंडाई केसर, मावा आणि मोतीचूर यांसारख्या फ्लेवर्सचा समावेश आहे. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी, झेस्टफुल बॉल्स, बटरस्कॉच रोशर, कॅश्यू बेमिसाल, कॅश्यू रोझ फँटसी, डेट लाडू आणि किवी-बदाम डिलाईट यांसारखे फ्लेवर्सदेखील दिले जात आहेत.