Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? फक्त ‘हे’ ३ मासे ठरतील वरदान; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायामासोबत आहाराकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अशावेळी काही प्रकारचे मासे आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं. हे मासे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाणून घ्या सविस्तर

Heart Attack : हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय? फक्त हे ३ मासे ठरतील वरदान; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!
HEART ATTACK
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 26, 2026 | 8:37 PM

आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायामासोबत आहाराकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अशावेळी काही प्रकारचे मासे आहारात समाविष्ट करणं फायदेशीर ठरतं.सॅल्मन,बांगडा आणि सार्डिन या माशांमध्ये ओमेगा फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. हे पोषक घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले.

सॅल्मन मासा

सॅल्मन हा ओमेगा – 3 फॅटी अॅसिडचा चांगला स्त्रोत आहे.यामध्ये इपीए आणि डीएचए हे महत्त्वाचे घटक असतात. ते रक्तातील ट्रायग्लिसराईड्सं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून सॅल्मन खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होऊ शकते.

Loading...

बांगडा मासा

बांगडा मासा हा भारतात सहज उपलब्ध होणाऱ्या माशांपैकी एक आहे.त्यामध्ये ओमेगा – 3 फॅटी अॅसिड आणि प्राथिनं असतात. हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी आहारात बांगड्याचा समावेश करू शकता.पण मासा तळण्याऐवजी शिजवणं किंवा वाफेवर तयार करणं अधिक चांगलं ठरू शकतं.

सार्डिन मासा

सार्डिन मासा हा आकाराने लहान असला तरी पोषक घटकांनी समृद्ध असतो. त्यामध्ये ओमेगा – 3 फॅटी अॅसिड, प्रथिनं आणि व्हिटॅमिन B 12 आढळतं. त्यामुळे संतुलित आहारात या माशाचाही समावेश करता येतो.

आठवड्यातून किती वेळा मासे खावेत?

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या शिफारशीनुसार, आठवड्यातून किमान दोन वेळा मासे खाणं हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.एका वेळी साधारण 85 ग्रॅम शिजवलेला मासा खाता येतो. मासे निवडताना त्यातील पाऱ्याच प्रमाणही लक्षात घेतं महत्त्वाचं आहे.

 

मासे खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

  1. मासे डीप फ्राय करण्याऐवजी ग्रील करून, वाफेवर किंवा कमी तेलात शिजवून घ्या, मगचं खा.
  2. नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा
  3. आहारात हिरव्या भाज्या, फळं आणि पूर्ण धान्यांचाही समावेश करा.

 

मात्र, केवळ मासे खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे टळत नाही. हृदय निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार,नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची आहे.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us