दिवाळीत भरपूर गोडधोड आणि तळलेले पदार्थ खाल्ले? पोटाचा त्रास कमी करण्यासाठी करा हे 5 उपाय

After Diwali Body Detox Tips: सणासुदीच्या काळात अनेक जण भरपूर गोड आणि तळलेले पदार्थ खातात. त्यामुळे ब्लोटिंग, गॅस, अॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराला पुन्हा ताजेतवाने आणि हलके वाटण्यासाठी बॉडी डिटॉक्स कसे करावे, ते जाणून घेऊया.

दिवाळीत भरपूर गोडधोड आणि तळलेले पदार्थ खाल्ले? पोटाचा त्रास कमी करण्यासाठी करा हे 5 उपाय
| Updated on: Nov 12, 2026 | 12:57 PM

दिवाळी आणि भाऊबीज दरम्यान अनेक जण भरपूर मिठाई आणि तळलेले पदार्थ खातात. कोणत्याही वेळी तेलकट पदार्थ खाणे आणि बराच वेळ एकाच जागी बसून राहण्याच्या सवयीमुळे पोटाचे आरोग्य बिघडू शकते. मिठाई, कचोरी, भजे-वडे यांसारखे पदार्थ जड असल्यामुळे त्यांचे पचन होणे सहज शक्य नसते. त्यामुळे सतत अॅसिडिटी, ब्लोटिंग, गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी अशा पदार्थांचे अतिसेवन टाळणे चांगले. डायटिशियन गीतिका चोप्रा यांच्या मते, सणासुदीच्या काळात मिठाई, तळलेले पदार्थ आणि तेलकट स्नॅक्स खाण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळी सिंपल डायटरी रेमेडीजच ट्राय केले पाहिजे. ज्यामुळे शरीर पुन्हा नॉर्मल रूटीनमध्ये येण्यासाठी मदत होते.

मिठाई आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाचा जडपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय

जिरे-बडीशेपचे पाणीः एका ग्लास पाण्यात जिरे आणि बडीशेप उकळून ते पिऊ शकता. हे ड्रिंक पिण्यास हलके असून काही लोकांना पचनाच्या समस्या आणि पोटफुगीपासून आराम मिळू शकतो.
आल्याचा चहा: आल्याचा चहा पचनाशी संबंधित समस्या आणि मळमळ कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र, यामध्ये अतिरिक्त साखर घालणे टाळावे.

Loading...

कोमट पाणी: सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यास मदत होते. कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया वेगवान होत नाही. मात्र, शरीर हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फायबरयुक्त पदार्थ: आहारात पपई, पेरू, ओट्स, डाळी, भाज्या आणि सॅलडचा समावेश करावा. फायबरमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येतो. मात्र, आहारातील फायबरचे प्रमाण हळूहळू वाढवावे.

प्रोबायोटिक पदार्थ: दही, ताक आणि इतर आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामुळे आतड्यांमधील चांगल्या सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत होते. हे पदार्थ पचनाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात.

या तीन गोष्टींची विशेष काळजी घ्या

• सणासुदीच्या काळात गरजेपेक्षा जास्त खाल्ले असेल तरी जेवण टाळू नका. त्याऐवजी पुन्हा सामान्य आणि संतुलित आहार घेण्यास सुरुवात करा.

• दररोज २० ते ३० मिनिटे हलके चालावे. विशेषतः जेवणानंतर थोडे चालणे फायदेशीर ठरते.

• काही दिवस मद्यपान, साखरयुक्त पेये आणि अतिप्रमाणात तळलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवा.

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी महागड्या डिटॉक्स ड्रिंक्सची, उपवास करण्याची किंवा क्रॅश डाएटची गरज नसते. आपले यकृत आणि मूत्रपिंड नैसर्गिकरीत्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे काम करतात. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, फायबरयुक्त पदार्थ, प्रथिने आणि प्रोबायोटिक पदार्थांचा आहारात समावेश करणे तसेच नियमित शारीरिक हालचाल करणे महत्त्वाचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us