आज खुश तो बहुत होंगे तुम….आनंदी असताना 72% टक्के भारतीय करतात ‘हे’ काम ; सर्वेक्षणातून माहिती समोर

| Updated on: Mar 21, 2023 | 12:31 PM

72% भारतीयांनी कबूल केले की ते आनंदी असताना ठराविक काम करतात. हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये जवळजवळ समान आहे. ते नक्की काय करतात हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा.

आज खुश तो बहुत होंगे तुम....आनंदी असताना 72% टक्के भारतीय करतात हे काम ; सर्वेक्षणातून माहिती समोर
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : आपले मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थिती मुख्यत्वे आपल्या खाण्याच्या सवयी (food habits) निर्धारित करते, हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. स्नॅकिंगमधील (snacking) ग्राहकांच्या सवयींवरील एका नवीन अभ्यासाने व्यक्तीची मानसिक स्थिती आणि स्नॅक्स खाण्याची इच्छा यांच्यातील मजबूत संबंध सिद्ध केला आहे. फ्रोझन स्नॅक्स मार्केटबद्दलचा दृष्टीकोन आणि धारणांवर या अभ्यासात (study) प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या अभ्यासात असे आढळून आले आहे की आनंदी असताना 72% भारतीय हे स्नॅक्स खाणे पसंत करतात. आणि हे स्त्री व पुरुष दोन्हींमध्ये समान आहे. 74% लोकांनी याची कबुली दिली, तर 70% पुरुषांनी त्यास सहमती दर्शवली.

सुरक्षितता, तंत्रज्ञान, चव, सुलभता आणि मूड सुधारणे ( STTEM – Safety, Technology, Taste, Ease & Mood Uplifter) या पाच घटकांवर भर देणारे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये असे आढळले की 70% भारतीयांना स्नॅक्स खाल्ल्यानंतर समाधानी, आनंदी आणि उत्साही वाटते. हा सर्व्हे देशातील उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागांमध्ये सुमारे 10 शहरांमध्ये करण्यात आला. त्यामध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, लखनऊ, कलकत्ता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा त्यामध्ये समावेश होता.

आनंदी असताना लोक स्नॅक्स खाण्यास देतात प्राधान्य

स्नॅक्स खाण्यामुळे व्यक्तीच्या मूडमध्ये कशी सुधारणा होते, यासंदर्भात या अहवालात माहिती नमूद करण्यात आली आहे. तसेच मानसिक स्थिती आणि स्नॅक्स खाण्याची तयारी यांच्या दरम्यान असलेला संबंधही स्पष्ट करण्यात आला आहे. आनंदात असताना स्नॅक्स खात असल्याचे भारतातील 72% लोकांनी मान्य केल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. तसेच 70% भारतीयांनी असेही म्हटले आहे की स्नॅक्स खाल्ल्यानंतर त्यांना आनंदी, उत्साही व समाधानी वाटते.

तसेच 56% लोक दु:खी असताना अधिक स्नॅक करण्याबाबत सहमत होते आणि 40% भारतीयांचा असा विश्वास आहे की स्नॅकिंग कंटाळवाणेपणातून बाहेर पडण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करते, असे या अहवालात आढळले.

81% दिल्लीवासी आनंदी असताना जास्त नाश्ता करतात आणि हैदराबाद (77%), चेन्नई (77%), कोलकाता (75%), मुंबई (68%), अहमदाबाद (67%) सारख्या प्रमुख शहरामध्ये ही आकडेवारी आहे. तर पुणे व बंगळुरू येथे 66% तर लखनऊमध्ये 62% आणि जयपूरमध्ये 61 % लोक आनंदी असताना स्नॅक्स खातात. 74% स्त्रिया तर 70% टक्के पुरूष हे आनंदी असताना जास्त नाश्ता करतात, असेही या सर्वेक्षणात आढळून आले.

रेडी टू इट पदार्थांची क्रेझ कुटुंबांमध्येही शिरल्याचे दिसून येत आहे. अहवालात असे दिसून आले आहे की भारतातील अर्ध्याहून अधिक पालक स्नॅक्सला लहान जेवण मानतात. एवढेच नाही तर भारतातील एक तृतीयांशहून अधिक पालकांनी स्नॅक्सला पूर्ण जेवण मानण्यास सुरुवात केली आहे. 34% पुरुष आणि 35% स्त्रियांनी हे सत्य स्वीकारले आहे.

44% भारतीयांचा असा विश्वास आहे की ज्या घरांमध्ये मेड किंवा स्वयंपाकी नाही अशा कुटुंबांसाठी स्नॅक्स हे जेवणाचा पर्याय सोपा करतात. 60% लोकांचा असा विश्वास आहे की ते बहुतेक तरुण आणि अविवाहित लोक वापरतात. सर्वेक्षणाला एकूण 2815 लोकांनी प्रतिसाद दिला, त्यापैकी 25% उत्तर भारतातील, 36% दक्षिण भारतातील, 25% देशाच्या पश्चिम भागातून आणि 14% देशाच्या पूर्व भागातील होते. अखिल भारतीय नमुना 42% अविवाहित लोक आणि 52% विवाहित लोकांचा समावेश आहे.