
उन्हाळ्याच्या तीव्र उन्हात, एअर कंडिशनर (AC) आपली थंड हवा देण्यासाठी पुन्हा एकदा सुरू होतो. पण काही वेळा AC ची कार्यक्षमता कमी होऊन थंड हवा मिळत नाही. याचे कारण वेगवेगळी असू शकतात जसे की, फिल्टरची साफसफाई न करणे, वेळेवर सर्व्हिसिंग न करणे, किंवा गॅस गळती होणे. यामुळे काही वेळेस AC नीट काम करत नाही, आणि गॅस रिफिल करण्याची आवश्यकता भासू शकते. चला तर मग, जाणून घेऊया AC मध्ये गॅस रिफिलची प्रक्रिया, खर्च आणि उपाय.
1. फिल्टरची साफसफाई: AC च्या फिल्टरची नियमितपणे साफसफाई केली जात नाही, तर धूळ आणि कचरा जमा होतो. यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो, आणि थंड हवा मिळत नाही.
2. सर्व्हिसिंगचा अभाव: प्रत्येक ३ ते ४ महिन्यांनी AC ची सर्व्हिस करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मोटर किंवा कॉम्प्रेसरमध्ये बिघाड होऊ शकतो.
3. गॅस गळती: जर AC मध्ये रेफ्रिजरंट गॅस गळत असेल, तर थंड हवा बंद होऊ शकते. गॅस गळती तपासून ती दुरुस्त करणं आणि गॅस रिफिल करणं आवश्यक आहे.
1. R22 गॅस: जुनी गॅस, पर्यावरणासाठी हानिकारक.
2. R410A गॅस: चांगली गॅस, वापरात आहे.
3. R32 गॅस: पर्यावरणस्नेही, वीजेची बचत करणारी नवीन गॅस.
१.५ टन क्षमतेच्या स्प्लिट AC साठी गॅस रिफिलचा खर्च साधारणत: २,००० ते २,५०० रुपये असतो. यामध्ये गॅसच्या प्रकारावर आणि गॅसचा प्रमाणावर आधारित खर्च भिन्न असू शकतो. काही वेळा पाइपलाइन दुरुस्ती आवश्यक असते, ज्यामुळे खर्च ३,००० रुपये किंवा त्याहून अधिक होऊ शकतो.
खर्चाचा तपशील मागा: गॅस रिफिल, गळती दुरुस्ती आणि इतर सेवांचा खर्च विचारून घ्या.
अधिकृत सर्व्हिस सेंटरचा वापर करा: कंपनीच्या अधिकृत टेक्निशियनकडूनच काम करून घ्या.
गॅसचा प्रमाण तपासा: टेक्निशियनने किती गॅस भरली याची खात्री करा.
वॉरंटी तपासा: नवीन AC वर गॅस रिफिल वॉरंटीअंतर्गत मोफत होऊ शकते.