AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! कोरोना काळात शिळे अन्न खाल्ल्यास ‘या’ गंभीर समस्यांना सामोरे जाण्याची भीती

देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे.

सावधान! कोरोना काळात शिळे अन्न खाल्ल्यास 'या' गंभीर समस्यांना सामोरे जाण्याची भीती
शिळे अन्न
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 02, 2021 | 7:16 AM
Share

मुंबई : देशामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपण आहारात देखील बदल केला आहे. मात्र, यादरम्यान आपण काही चुका देखील करत आहोत. बहुतेक लोक दिवसभरातून एकदाच दोनवेळचे अन्न शिजवतात जेणेकरून त्यांना पुन्हा पुन्हा स्वयंपाक करावा लागत नाही. (Avoid eating stale food during corona)

आपण जास्त अन्न शिजवतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर गरम करून पुन्हा एकदा खातो. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात असे करणे टाळावेच कारण याचा आपल्या आरोग्यावर परिणाम पडतो. यामुळे आपण अनेक आजारांना निमंत्रणच देत असतो. सध्याच्या वातावरणात तर प्रत्येक वेळेला ताजे अन्न खाणे आवश्यक आहे.

अन्न शिजवल्यानंतर काही तासांतच ते फ्रिजमध्ये ठेवले नाही तर, त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे अन्न खराब होऊ शकते. या हानिकारक बॅक्टेरियांमुळे अन्न विषबाधा अर्थात फूड पॉयझानिंग होण्याचा धोकाही वाढतो. विशेषत: शिळा भात खाऊ नये. कारण काही काळ रूम टेम्प्रेचरवर ठेवल्यानंतर तो भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

सगळ्याच प्रकारचे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषत: अंडी, तांदूळ, सीफूड, चिकन आणि प्रक्रिया केलेले तेलकट पदार्थ शिळे खाणे टाळावे. या सर्व गोष्टींमध्ये बॅक्टेरिया पटकन वाढतात. म्हणून, या गोष्टी बर्‍याच दिवसांनंतर खाऊ नयेत. जर अन्न विषबाधा वाढली, तर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास देखील वाढतो.

शरीर निर्जलीकरण होण्यास सुरुवात होते आणि शरीरात पाण्याचा अभाव निर्माण होऊ शकतो. म्हणून, शिळे अन्न खाण्यापूर्वी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. जेव्हा आपण ताजे अन्न शिजवतो, तेव्हा रूम टेम्प्रेचरवर थंड झाल्यावरच ते फ्रीजमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात.

(टीप : सदर माहिती ही सामान्य संशोधनावर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Avoid eating stale food during corona)

Follow Us
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र