Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे...
मसाज

मसाज केल्यानंतर आपल्याला आपल्या त्वचेमध्ये त्याचे बरेच फायदे दिसून येतात. चला तर या फायद्यांबद्दल जाणून घेऊया...

Harshada Bhirvandekar

|

Dec 19, 2020 | 4:24 PM

मुंबई : हिवाळ्याच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. आपली व्यस्त जीवनशैली आणि वाढता तणावाचे हे याचे मुख्य कारण देखील असू शकते. कोरोनामुळे ताणतणावाच्या पातळी लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत घर किंवा ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी आपण बर्‍याच वेळा विचार करतो. जास्त ताण घेतल्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह आपल्या त्वचेवर देखील दिसून येतो (Skin Care Benefits of Face Massage).

दिवसभर काम केल्यानंतर चेहऱ्याला हलकी मालिश केल्याने आपल्याला आराम मिळतो. मालिश केल्याने आपले शरीरच नव्हे तर, त्वचेलाही आराम मिळतो. आपण फेस पॅक, तेल किंवा फेस मास्क लावून चेहऱ्यावर मसाज करू शकता. बऱ्याचवेळा आपल्याला असा प्रश्न पडतो की, चेहऱ्याला मसाज करणे का महत्त्वाचे आहे. मसाज केल्यानंतर आपल्याला आपल्या त्वचेमध्ये त्याचे बरेच फायदे दिसून येतात. चला तर या फायद्यांबद्दल जाणून घेऊया…

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

नियमित मसाज केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची समस्या कमी होते. वयाच्या 30व्या वर्षानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. यापासून समस्या सुरु होण्याआधीच रोखण्यासाठी दररोज 5 ते 8 मिनिटांसाठी चेहऱ्यावर मसाज करा. तसेच, चेहऱ्यावर मालिश करण्यासाठी आपण चांगली उत्पादने वापरली पाहिजेत.

त्वचा मुलायम होते.

चेहऱ्याची त्वचा मऊ ठेवण्यासाठी चेहऱ्यावर हलक्या हातांनी मालिश करा. कधीही प्रेशरने मालिश करू नका, यामुळे आपल्या त्वचेचे नुकसान होईल. मसाज करण्यासाठी बोटांचा वापर करू इच्छित नसल्यास, आपण फेस रोलर किंवा आईस रोलर वापरू शकता (Skin Care Benefits of Face Massage).

त्वचा चमकदार बनते.

मसाज केल्यामुळे आपल्या त्वचेत घट्टपणा निर्माण होतो, ज्यामुळे ती चमकदार बनते. यासाठी टॉवेलमध्ये किंवा एका स्वच्छ कपड्यात बर्फाचे काही तुकडे ठेवून, त्याने हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेची डलनेस देखील दूर होतो. मसाज केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर अवश्य लावा.

रक्त प्रवाह वाढतो.

चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे तुमच्या त्वचेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये वरच्या बाजूस मसाज करा. दररोज 5 मिनिटांचा मसाज त्वचेला नवसंजीवनी प्रदान करतो.

(Skin Care Benefits of Face Massage)

हेही वाचा : 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें