Skin Care | सकाळी उठताच थंड पाण्याने धुवा चेहरा, चिरकाळ टिकून राहील त्वचेचे तारुण्य!

थंड पाणी चेहऱ्यासाठी खूप लाभदायी आहे. थंड पाण्याचे एक किंवा दोन नव्हे, तर 5 प्रकारचे त्वचेचे फायदे मिळू शकतात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:28 AM, 9 Dec 2020
Skin Care | सकाळी उठताच थंड पाण्याने धुवा चेहरा, चिरकाळ टिकून राहील त्वचेचे तारुण्य!

मुंबई : दररोज सकाळी उठल्यावर, आपल्या चेहर्‍यावर काहीसा जडपणा जाणवतो. यामागील कारण कदाचित आपल्याला माहित नसेल. वास्तविक, जेव्हा आपण झोपतो तेव्हा त्वचेमध्ये नवीन पेशी तयार होत असतात. त्या वेळी,  त्वचेवरी रोमछिद्र (पोर्स) थोडी मोठी होतात, ज्यामुळे आपला चेहरा काहीसा जाडसर होतो आणि तो सूजल्यासारखा दिसतो (Skin Care routine Wash your face with cold water for glowing skin).

आपल्यालाही समस्या असेल आणि आपण यातून मुक्त होऊ इच्छित असाल, तर दररोज सकाळी उठल्याउठल्या थंड पाण्याने चेहरा धुवा. थंड पाणी चेहऱ्यासाठी खूप लाभदायी आहे. थंड पाण्याचे एक किंवा दोन नव्हे, तर 5 प्रकारचे त्वचेचे फायदे मिळू शकतात.

  1. सुरकुत्या कमी होतील.

थंड पाणी एक उत्कृष्ट अँटी रिंकल क्रीम सारखे कार्य करते. हे आपल्या त्वचेला चमकदार बनवते आणि स्कीन बूस्ट करते. तसेच, त्वचेला ताजेतवाने आणि तरूण बनवते. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होतात. सकाळी उठल्यानंतर दररोज आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या चेहर्‍यावर एक वेगळ्या प्रकारचा तजेला येईल.

  1. त्वचेच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होईल.

थंड पाण्याने आपला चेहरा धुतल्याने आपल्या त्वचेचा पोत सुधारतो. थंड पाण्यामुळे आपल्या त्वचेवरील पोर्स त्वचेला आकुंचित करतात. यामुळे, आपला रक्त प्रवाह वाढून, अँटी एजिंग अर्थात त्वचेच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेची गती कमी होते. ज्यामुळे आपला चेहरा कायम चमकदार राहतो.

  1. चेहऱ्यावरील सूज कमी होईल.

जर तुम्हाला बराच काळ जागे राहण्याची सवय असेल आणि सकाळी उठल्यावर तुमचा चेहरा अधिक सुजलेला वाटत असेल तर, सतत थंड पाण्याने तोंड धुणे तुमच्या चेहर्‍यासाठी एक रामबाण औषध सिद्ध होईल. थंड पाण्यामुळे पोर्स घट्ट होतील आणि ते आपल्या चेहर्‍याला चमकदार होईल (Skin Care routine Wash your face with cold water for glowing skin).

  1. टॅनिंग कमी होईल.

जर आपला चेहरा उन्हामुळे टॅन/गडद झाला आहे असे वाटत असेल, तर आपण सतत थंड पाण्याने तोंड धुतले पाहिजे. ते आपल्या त्वचेसाठी ढाल अर्थात शील्ड म्हणून काम करेल. थंड पाणी आपल्या चेहऱ्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून देखील वाचवते. वास्तविक, थंड पाणी हळूहळू आपल्या उन्हाने बाधित त्वचेला मृत पेशींमध्ये रुपांतरित करते. जी स्क्रब करताना आपल्या चेहऱ्यापासून विभक्त होते आणि आपली त्वचा पुन्हा चमकू लागते.

  1. मेकअप जास्त काळ टिकेल.

जर आपल्याला असे वाटत असेल की, आपला मेकअप फार काळ टिकत नाही आणि एखाद्या कार्यक्रमासाठी आपल्याला तो बराच काळ टिकवायचा असेल तर, मेकअप लावण्यापूर्वी आपला चेहरा थंड पाण्याने धुवावा. असे केल्याने आपल्या चेहऱ्यावरील पोर्स घट्ट राहतात आणि आपला मेकअप जास्त काळ टिकतो.

(Skin Care routine Wash your face with cold water for glowing skin)