AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा!

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, आपण काही घरगुती फेसपॅक वापरून सुध्दा आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी 'हे' फेसपॅक चेहऱ्याला लावा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jul 04, 2021 | 5:23 PM
Share

मुंबई : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, आपण काही घरगुती फेसपॅक वापरून सुध्दा आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो. या घरगुती फेसपॅकमुळे आपली त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी सौम्य क्लीन्सरचा वापर केला पाहिजे. घरचे-घरी फेसपॅक नेमके कसे करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Apply this face pack on the face to get glowing skin)

घरच्या घरी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला हळद, दही, दुधावरचा साय, गुलाब पाणी आणि मध लागणार आहे. वरील हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण एक वीस मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून एकदा तरी लावला पाहिजे. हा फेसपॅक लावल्यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

अर्धी केळी आणि तीन चमचे कोरफड लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये कोरफड मिक्स करून घ्या. यानंतर ही तयार झालेली पेस्ट चेहऱ्यासह मानेवर लावा. तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा, हा खास फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल.

बटाट्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक बटाटा आणि चार चमचे मध घ्या. सर्वात अगोदर बटाटा किसून घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट मिक्स करून बारीक करून घ्या. हा फेसपॅक एक तासांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this face pack on the face to get glowing skin)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...