Hair Care : तुम्ही पण केसांना मेंहदी लावल्यानंतर 2-3 तास ठेवता? तर ‘या’ दुष्परिणामांबद्दल वाचा!

| Updated on: Oct 04, 2021 | 7:52 AM

केसांना कलर देण्यासाठी अनेक लोक डाईऐवजी मेंहदी लावतात. हे नैसर्गिकरित्या केसांना कंडिशन करण्यास मदत करते. यामुळे केसांना चमक येते. याशिवाय मेंहदी केसांचा नैसर्गिक रंग देण्यासही मदत करते. मेहंदी लावताना बऱ्याच लोकांना असे वाटते की, सतत मेंहदी केसांना लावल्यामुळे आपले केस सुंदर आणि केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

Hair Care : तुम्ही पण केसांना मेंहदी लावल्यानंतर 2-3 तास ठेवता? तर या दुष्परिणामांबद्दल वाचा!
मेंहदी
Follow us on

मुंबई : केसांना कलर देण्यासाठी अनेक लोक डाईऐवजी मेंहदी लावतात. हे नैसर्गिकरित्या केसांना कंडिशन करण्यास मदत करते. यामुळे केसांना चमक येते. याशिवाय मेंहदी केसांचा नैसर्गिक रंग देण्यासही मदत करते. मेहंदी लावताना बऱ्याच लोकांना असे वाटते की, सतत मेंहदी केसांना लावल्यामुळे आपले केस सुंदर आणि केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल. मात्र, तसे काहीही नाहीये. सतत मेंहदी लावल्याने केस खराब होतात.

केसांवर मेंहदी किती वेळ ठेवावी

केसांना कलर करण्यासाठी लोक 3 ते 4 तास मेंहदी लावत राहतात. या व्यतिरिक्त, काही लोक केसांना कंडिशन करण्यासाठी मेंहदीवर दोन तास लावूनच ठेवतात. तुम्हीही असे करत असाल तर ही सवय त्वरित बदला. असे केल्याने केस खराब होतात.

यामुळे तुमचे केस कोरडे होतात आणि त्यांची पोतही खराब होते. तज्ञांच्या मते, केसांना मेंहदी लावल्यानंतर साधारण दिड तासांपेक्षा अधिक ठेवू नये. जर तुम्ही कंडीशनिंगसाठी मेहंदी लावली असेल तर ती 45 मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नका.

मेंहदीसोबत तेल लावा

कधीकधी मेंहदी लावल्याने केस कोरडे आणि खडबडीत होतात. केस कोरडे होण्यापासून रोखण्यासाठी, मेंहदीसह तेल लावा. जर तुम्ही कलरसाठी मेंहदी लावत असाल तर तुम्ही ऑलिव्ह ऑईल किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही तेल वापरू शकता. जर तुम्ही कंडीशनिंगसाठी मेंहदी लावत असाल तर या मिश्रणात एक चमचा दही मिसळा.

मेंहदीने केस धुल्यानंतर केसांमध्ये तेल किंवा सीरम लावा. जर तुम्ही केस गळणे आणि कोंडा होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर मेंहदी लावताना मिश्रणात एक चमचा लिंबाचा रस, दही, आवळा घाला. या सर्व गोष्टी मिसळा आणि टाळूवर लावा. हे मिश्रण सौम्य शैम्पूने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Applying mehndi on the hair for 2-3 hours causes these side effects)