AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काकडी आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता.

काकडी आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 4:43 PM
Share

मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण शक्यतो घरगुती उपायांचा अवलंब केला पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होते. (Cucumber and curd face pack is beneficial for the skin)

चेहऱ्याला हेल्दी ठेवण्यासाठी आपण आठ दिवसांमधून एकदा तरी काकडी आणि दह्याचा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे. यासाठी अर्धी काकडी आणि दही लागणार आहे. काकडीची एकदम बारीक पेस्ट मिक्सरमध्ये करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि साधारण वीस मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन निघून जाण्यास नक्की मदत होईल.

अर्धी काकडी किसून त्यात कोरफड जेल घाला. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि साधारण अर्धा तासानंतर ते पाण्याने धुवा. काकडी त्वचेला हायड्रेटेड ठेवते. त्यातील कोरफड त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक केळी, एक वाटी दही आणि हळद लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर शेवटी त्या पेस्टमध्ये हळद मिक्स करा.

ही पेस्ट दहा मिनिटे तशीच ठेवा आणि संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण वीस मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. दह्यामध्ये नैसर्गिक अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपण इच्छित असल्यास, दह्याचा फेस मास्क तयार करून तो लावू शकता, यामुळे आपली मुरुमांची समस्या कमी होईल. याशिवाय मुरुमांमुळे येणारी खाज देखील दूर होईल. दहीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत जे डोक्यातील कोंडा आणि स्काल्पशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Cucumber and curd face pack is beneficial for the skin)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली