Sandalwood Benefits : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी चंदन अत्यंत फायदेशीर!

| Updated on: Oct 05, 2021 | 12:15 PM

आयुर्वेदात चंदनाचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो. मुरुमापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही चंदन वापरू शकता. ते पावडर, पेस्ट किंवा तेलाच्या स्वरूपात वापरले जाऊ शकते. चंदनमध्ये जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेसाठी चांगले आहेत.

Sandalwood Benefits : त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी चंदन अत्यंत फायदेशीर!
सुंदर त्वचा
Follow us on

मुंबई : आयुर्वेदात चंदनाचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो. मुरुमापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही चंदन वापरू शकता. ते पावडर, पेस्ट किंवा तेलाच्या स्वरूपात वापरले जाऊ शकते. चंदनमध्ये जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेसाठी चांगले आहेत. दररोज चेहऱ्याला चंदन लावल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते.

मुरुमाची समस्या

चंदन तुमच्या त्वचेला घट्ट करते. हे तुमच्या त्वचेला अॅलर्जीपासून वाचवते. एक चमचे चंदन तेल आणि एक चिमूटभर हळद आणि कापूर मिसळा. ते चांगले मिसळा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. रात्रभर सोडा आणि कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते.

चेहऱ्यावरील टॅन

चंदन त्वचा चमकदार बनवते. हे तुमच्या त्वचेवरील काळे डाग दूर करण्यास मदत करते. टॅन काढण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. एका वाडग्यात एक चमचा चंदन पावडर आणि खोबरेल तेल मिसळा. चेहऱ्यावर मालिश करा आणि रात्रभर सोडा. गडद डागांपासून मुक्त होण्यासाठी आणि टॅन दूर करण्यासाठी आठ दिवसातून एका हा पॅक चेहऱ्याला लावा.

कोरड्या त्वचेसाठी

कोरड्या आणि निर्जीव त्वचेमुळे बरेच लोक त्रस्त असतात. चंदन फेस पॅक लावल्याने कोरड्या आणि निर्जीव त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. एका वाडग्यात एक चमचा मिल्क पावडर आणि चंदन तेलाचे काही थेंब मिसळा. पेस्ट बनवण्यासाठी त्यात थोडे गुलाब पाणी घाला. ते चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे सोडा. थंड पाण्याने ते धुवा. यानंतर त्वचेला मॉइश्चराइझ करा.

चंदन तेल, हळद आणि कापूर फेस पॅक

एका चमचा हळदीमध्ये एक चिमूटभर कापूर मिसळा आणि त्यात चंदन तेल घालून त्याची पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी फेस पॅक प्रमाणे ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. सकाळी उठल्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमचा चेहरा चमकदार होईल आणि मुरुमांच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.

चंदन आणि दही फेस पॅक

एक चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात अर्धा चमचा मध, अर्धा चमचा दही मिसळा. तिन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेस पॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. अप्लाय केल्यानंतर, ते 15 मिनिटे पुरपणे कोरडे होऊ द्या. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होईल, आपल्या चेहर्‍याची चमक वाढेल आणि मुरुमांपासून मुक्ती मिळेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Sandalwood is extremely beneficial for relieving skin problems)