Skin | उन्हाळ्यात चिकट त्वचेची समस्या आहे? मग हे घरगुती फेसपॅक नक्कीच वापरा!

| Updated on: May 31, 2022 | 9:24 AM

त्वचेचा चिकटपणा दूर करण्यासाठी ओट्स मदत करतात. यासाठी ओट्सची बारीक पावडर करा आणि त्यामध्ये दोन चमचे दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा तेलकटपणा दूर होण्यास मदत होते.

Skin | उन्हाळ्यात चिकट त्वचेची समस्या आहे? मग हे घरगुती फेसपॅक नक्कीच वापरा!
Image Credit source: dermadoctor.com
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या हंगामात आपली त्वचा अधिक तेलकट होते. यामुळे त्वचेवरील चिकटपणा वाढतो. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये लग्नांचे सिझन असते. जर आपली त्वचा (Skin) सारखीच चिकट होत असेल तर आपण कितीही मेकअप केला तरीही काही उपयोग होत नाही. मेकअप केल्यावर त्वचा चिकट झाली तर आपला लूक अधिक खराब होतो. यामुळे या हंगामात त्वचा चिकट होणार नाही, याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. तेलकट त्वचा असलेले लोक त्वचेचे तेल उत्पादन नियंत्रित करण्यासाठी आणि ते निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने वापरतात. मात्र, त्याचा काही उपयोग होत नाही. जर खरोखरच आपल्याला तेलकट त्वचेची (Oily skin) समस्या कायमची दूर करायची असेल तर आपण सरळ घरगुती फेसपॅक लावून ही समस्या दूर करायला हवी.

ओट्स

त्वचेचा चिकटपणा दूर करण्यासाठी ओट्स मदत करतात. यासाठी ओट्सची बारीक पावडर करा आणि त्यामध्ये दोन चमचे दूध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर वीस मिनिटांनी चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा तेलकटपणा दूर होण्यास मदत होते. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोनदा वापरू शकतो.

मुलतानी माती

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मुलतानी माती आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक वापरू शकता. यासाठी मुलतानी माती तीन चमचे घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आता आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक त्वचेचे अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते.

हे सुद्धा वाचा

लिंबू

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचे काम करते. हे त्वचेचे अतिरिक्त तेल उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. दुधात लैक्टिक ऍसिड असते. हे त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. यासाठी एक चमचा बेसन घ्या, त्यामध्ये दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा दूध मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील चिकटपणा दूर होण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)