Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘हे’ आयुर्वेदिक उपाय फायदेशीर, वाचा!

| Updated on: Dec 09, 2021 | 9:55 AM

हिवाळ्यात त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते. या हंगामात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. हे हवामान त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी आपण मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे.

Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय फायदेशीर, वाचा!
त्वचा
Follow us on

मुंबई : हिवाळ्यात त्वचेची (Skin) अधिक काळजी घेण्याची गरज असते. या हंगामात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. हे हवामान त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेते. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी आपण मॉइश्चरायझरचा वापर केला पाहिजे. आपण काही घरगुती उपाय करूनही त्वचेला मऊ आणि हायड्रेटेड ठेऊ शकतो. हे उपाय नेमके कोणते हे जाणून घेऊयात.

तूप आणि खोबरेल तेल

तूप त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. तूप आणि खोबरेल तेल या दोन्हीमध्ये नैसर्गिक घटक असतात. जी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. तुपात वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेच्या वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. हिवाळ्याच्या हंगामात तूप आणि खोबरेल तेल मिक्स करून त्वचेला लावल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते.

कोरफड

कोरफड आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे कोरफड कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करते. आंघोळीनंतर तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून कोरफड वापरू शकता. कोरफडमध्ये चिमूठभर हळद मिक्स करा आणि आपल्या त्वचेला लावा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते.

दूध आणि मध

हिवाळ्याच्या हंगामात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी मध आणि दूध देखील खूप फायदेशीर आहेत. यासाठी दोन चमचे दूध मधामध्ये मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते.

क्लींजिंग

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी दिवसातून दोनदा चेहरा धुणे आवश्यक आहे. मात्र, त्यामुळे हिवाळ्यात त्वचेला कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे अधिक रासायनिक उत्पादने वापरणे टाळावे. तुम्ही सौम्य किंवा नैसर्गिक क्लीन्सर वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..