Winter Face Mask | हिवाळ्यात ‘हे’ मॉइश्चरायझिंग फेस मास्क वापरा आणि तजेलदार त्वचा मिळवा!

हिवाळ्याच्या हंगामात त्वचा कोरडी (Dry skin) पडण्याच्या समस्येमध्ये मोठी वाढ होते. अनेक उपाय करूनही त्वचेचा कोरडेपणा काही दूर होत नाही. मग अशावेळी आपण काही खास घरगुती उपाय केले पाहिजेत.

Winter Face Mask |  हिवाळ्यात 'हे' मॉइश्चरायझिंग फेस मास्क वापरा आणि तजेलदार त्वचा मिळवा!
त्वचेची काळजी
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 8:53 AM

मुंबई : हिवाळ्याच्या हंगामात त्वचा कोरडी (Dry skin) पडण्याच्या समस्येमध्ये मोठी वाढ होते. अनेक उपाय करूनही त्वचेचा कोरडेपणा काही दूर होत नाही. मग अशावेळी आपण काही खास घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही होममेड मॉइश्चरायझिंग फेस मास्क वापरू शकता.  मॉइश्चरायझिंग फेस मास्क तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

मध आणि दुधाचा फेस मास्क

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तीन चमचे दूध घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे मध मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. काही वेळ तसेच राहूद्या आणि मसाज करा. वीस मिनिटांनी थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. हा उपाय आपण आठ दिवसातून तीन वेळा करायला हवा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

ग्लिसरीन आणि कोरफड

हिवाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेला तजेलदार ठेवण्याचे काम ग्लिसरीन करते. ग्लिसरीनमुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते. आपण घरच्या-घरी ग्लिसरीन आणि कोरफडचा फेस मास्क तयार करू शकतो. यासाठी दोन चमचे ग्लिसरीन आणि तीन चमचे कोरफडचा गर आपल्याला लागणार आहे. हे मिक्स करून याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी आपला चेहरा धुवा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

मध आणि पाणी

मध त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. आपण दोन चमचे मधामध्ये पाणी मिक्स करावे आणि आपल्या त्वचेला लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. विशेष म्हणजे हे रात्री झोपण्याच्या अगोदर करणे अधिक फायदेशीर आहे. मधामध्ये कॅल्शियम, तांबे, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त इत्यादींसारखी अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही जीवनसत्त्वे आणि खनिजे त्वचेच्या पेशींचे पोषण करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.