चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: Dec 08, 2020 | 12:33 PM

जगभरातील अनेक लोक दररोज चहा-कॉफीचं सेवन करतात (benefit and side effect of tea-coffee and alcoholic beverages).

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही... त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?
Follow us on

मुंबई : जगभरातील अनेक लोक दररोज चहा-कॉफीचं सेवन करतात. चहा-कॉफी सध्या अनेकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. त्यांची सकाळ चहा आणि कॉफी पासूनच सुरु होते. त्यांना चहा आणि कॉफीची सवय झालेली असते. त्याचप्रमाणे अनेक लोक बियर, वाईन, दारुचं दररोज सेवन करतात. दारु शरीरासाठी हानिकारक आहे, असं नेहमी म्हटलं जातं. मात्र, त्याचं सेवन नियंत्रणात केलं तर त्याचेदेखील फायदे असल्याचं काही संशोधनांमध्ये समोर आलं आहे. मात्र, त्याची सवय किंवा वेसन असणं चुकीचं आहे. या पदार्थांचे नेमके काय फायदे आणि तोटे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत (benefit and side effect of tea-coffee and alcoholic beverages).

चहा

चहा पाणी, दूध, चहापत्ती आणि साखर पासून तयार केला जातो. मात्र, सर्वसामान्य चहा पेक्षा आयुर्वेदिक चहा जास्त फायदेशीर असतो, असं म्हटलं जातं. आयुर्वेदिक चहापासून पोषक तत्व, विटॅमिन, अँटीऑक्सिडेंट मिळतं. चहाचे अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी, ब्लॅक टी, हर्बल टी, कॅमोमाईल टी, दालचिनीचा चहा असे अनेक प्रकार आहेत. स्वत:ला फ्रेश करण्यासाठी चहा आपल्या उपयोगी येतो. पण तज्ज्ञांच्या मते, सामान्य चहाचं सेवन कमी करणंच शरीरासाठी योग्य आहे (benefit and side effect of tea-coffee and alcoholic beverages).

कॉफी

चहा सारखं कॉफी देखील अनेक लोकांना आवडते. आरोग्यविषयी माहिती देणारी myupchar वेबसाईटनुसार, उत्तेजक पदार्थ म्हणून कॉफीचा वापर केला जातो. कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे आपली मज्जासंस्था उत्तेजित होते. कॉफीमध्ये सामान्य प्रमाणात व्हिटॅमिन बी, अतिशय कमी प्रमाणात मँगनीज आणि पोटॅशियम असतं. तज्ज्ञांच्या मते आपण कॉफीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणं जरुरीचं आहे. कारण अति कॅफिनमुळे आपली मज्जासंस्था आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

बियर

बियर हे दारुचं पहिलं रुप आहे, असं म्हणतात. बियर हे तांदूळ, मका आणि इतर धान्य उकळून त्यावर प्रक्रिया करून तयार केली जाते. पाश्चिमात्य देशांमध्ये थकवा दूर करण्यासाठी नियमितपणे याचा वापर केला जातो. त्यात अधिक कॅलरी असते. हा कार्बोहायड्रेट्स, अल्प प्रमाणात प्रथिने आणि खनिजांचा स्रोत आहे. बिअर हे आरोग्यदायी पेय मानले जात नाही कारण त्यात अल्कोहोलचे प्रमाण असतं. अल्कोहोल आपल्या शरीराला हानिकारक आहे.

वाईन

वाईनदेखील दारुचाच एक प्रकार आहे. द्राक्षांना उकळून वाईन तयार केली जाते. वाईनचे दोन प्रकार असतात. रेड वाईन आणि व्हाईट वाईन असे त्याचे दोन प्रकार असतात. दोघांमध्ये वेगवेगळे पोषक तत्वे असतात. मात्र ते द्राक्षे कोठून बनवली जातात, ते कोणत्या मातीत आणि हवामानात पिकवले गेले यावर ते अवलंबून असतं. बहुतेक वाईनमध्ये टॅनिन, फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे द्राक्षांच्या बाह्य भागात आढळतात. तज्ज्ञांच्या मते, वाईनच्या सेवनामुळे दीर्घकालीन आजार दूर होतात. मात्र, हा कोणत्याही रोगावर उपाय नाही. दररोज वाईन प्यायल्याने त्याची वाईट सवय लागू शकते. हे व्यसन आरोग्यासाठी हानिकारक आहे, असं तज्ज्ञ डॉक्टरांचं मत आहे.

सायडर

सफरचंदांपासून सायडर तयार केले जाते. त्याची तयार करण्याची प्रक्रिया बिअर किंवा वाईनसारखीच असते. सफरचंदांमध्ये आढळणारी खनिजे आणि विटामिनमुळे ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सफरचंदमध्ये अँटीऑक्सिडंट्सची घनता जास्त असते, ज्यामुळे आपल्या आरोग्याला फायदा होतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते सायडरच्या वापरावरही नियंत्रण ठेवले पाहिजे. त्याच्या व्यसनाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

दारु (ब्रँडी, व्हिस्की, रम, व्होडका इत्यादी)

दारु ज्या प्रक्रियेत तयार केली जाते त्या प्रक्रियेत सर्व प्रकारचे विटामिन आणि पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे दारु पिल्याने आरोग्यास काहीच फायदा होत नाही. उलट दारु आरोग्यस हानिकार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

(टीप : संबंधित माहिती ही तज्ज्ञांनाच्या मतावर आधारित आहे)

हेही वाचा : पुरुषांच्या, पुरुषांसाठी, पुरुषांद्वारे बातम्या, महिलांच्या दृष्टीकोनाला बातम्यांमध्ये अद्यापही स्थान नाही, मीडियाचं भयानक वास्तव