Bhaubeej 2026: भाऊबीजेला बहिणीला राशीनुसार द्या खास गिफ्ट, वर्षभर लाभेल नशिबाची साथ!

Bhaubeej : भाऊबीजेला बहिणीला गिफ्ट देणे हा तिच्याप्रती प्रेम व्यक्त करण्याचा एक खास मार्ग आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या खास दिवशी बहिणीच्या राशीनुसार भेटवस्तू देणेही शुभ मानले जाते. जाणून घ्या.

Bhaubeej 2026: भाऊबीजेला बहिणीला राशीनुसार द्या खास गिफ्ट, वर्षभर लाभेल नशिबाची साथ!
| Edited By: | Updated on: Nov 11, 2026 | 2:44 PM

भाऊबीजेचा सण यंदा बुधवार, 11 नोव्हेंबर 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करतात. तर भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्याप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करतात.
भाऊबीजेला बहिणीच्या आवडीची भेटवस्तू देणे हा प्रेम व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार बहिणीच्या राशीचा विचार करून भेटवस्तू निवडली, तर ती अधिक शुभ मानली जाते. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचा संबंध एका विशिष्ट ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे त्या राशीच्या स्वामी ग्रहाशी संबंधित रंग किंवा वस्तू भेट म्हणून देणे शुभ मानले जाते. चला तर मग, जाणून घेऊया यंदाच्या भाऊबीजेला बहिणीच्या राशीनुसार तिला कोणती खास भेटवस्तू देता येईल.

मेष
या राशीचा राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. मंगळ हा साहस, ऊर्जा, पराक्रम आणि आत्मविश्वासाचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशीच्या बहिणीला लाल रंगाशी संबंधित वस्तू गिफ्ट देणे चांगले ठरेल. तुम्ही तिला लाल रंगाची साडी, ड्रेस, पर्स, घड्याळ किंवा लाल रंगाची एखादी सुंदर अ‍ॅक्सेसरी भेट देऊ शकता.

Loading...

वृषभ
वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्राला सुख-सुविधा, प्रेम, सौंदर्य आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. त्यामुळे या राशीच्या बहिणीसाठी पांढऱ्या, क्रीम किंवा फिकट गुलाबी रंगाच्या वस्तू भेट म्हणून निवडणे चांगले मानले जाते.
मिथुन
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह असून, हा बुद्धिमत्ता, वाणी, संवाद आणि व्यापाराचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशीच्या बहिणीसाठी हिरव्या रंगाच्या भेटवस्तू चांगल्या ठरू शकतात. तिला हिरव्या रंगाचा ड्रेस, डायरी, पुस्तके, मोबाईल अ‍ॅक्सेसरीज किंवा एखादे उपयुक्त गॅजेट भेट देऊ शकता.
कर्क
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मन, भावना, शांतता आणि मानसिक सुखाचा कारक मानले जाते. त्यामुळे कर्क राशीच्या बहिणीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू भेट देणे शुभ मानले जाते.
सिंह
सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह असून, हा आत्मविश्वास, मान-सन्मान, नेतृत्व आणि प्रतिष्ठेचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशीच्या बहिणीला सोनेरी, केशरी किंवा फिकट लाल रंगाच्या भेटवस्तू देणे चांगले मानले जाते.
कन्या
कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असून, हा बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि संवाद कौशल्याचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे या राशीच्या बहिणीला हिरव्या रंगाच्या वस्तू भेट देणे चांगले मानले जाते. तुम्ही तिला हिरव्या रंगाची पर्स, ड्रेस, डायरी किंवा पेन सेट भेट देऊ शकता.
तूळ :
तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. शुक्राचा संबंध प्रेम, आकर्षण, कला, सौंदर्य आणि भौतिक सुख-सुविधांशी जोडला जातो. त्यामुळे या राशीच्या बहिणीला पांढऱ्या, क्रीम किंवा फिकट गुलाबी रंगाच्या भेटवस्तू देणे शुभ मानले जाते.
वृश्चिक
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असून, हा ऊर्जा, साहस आणि आत्मबळाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या राशीच्या बहिणीला लाल किंवा मरून रंगाच्या भेटवस्तू देऊ शकता.
धनु
धनु राशीचा स्वामी देवगुरू बृहस्पती आहे. गुरूला ज्ञान, शिक्षण, धर्म, भाग्य आणि समृद्धीचा कारक मानले जाते. त्यामुळे या राशीच्या बहिणीला पिवळ्या रंगाच्या वस्तू भेट देणे शुभ मानले जाते.
मकर
मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे. शनीला कर्म, शिस्त, मेहनत आणि न्यायाचा कारक मानले जाते. त्यामुळे या राशीच्या बहिणीला गडद निळ्या किंवा काळ्या रंगाच्या वस्तू भेट देणे चांगले मानले जाते.
कुंभ
कुंभ राशीचाही स्वामी शनिदेव आहे. शनीचा संबंध संयम, जबाबदारी आणि कर्मप्रधान जीवनाशी जोडला जातो. त्यामुळे या राशीच्या बहिणीला निळ्या, काळ्या किंवा गडद रंगाच्या भेटवस्तू देणे शुभ मानले जाते.
मीन
मीन राशीचा स्वामी देवगुरू बृहस्पती आहे. गुरूला ज्ञान, धर्म, भाग्य आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या राशीच्या बहिणीला पिवळ्या किंवा सोनेरी रंगाच्या भेटवस्तू देणे चांगले मानले जाते.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us