उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर आतुन थंड राहणे फार महत्वाचे असते. यासाठी आपण अनेक थंड पदार्थांचे सेवन करत असतो. यासाठी तुम्ही सुद्धा या भाजीचा रस प्यायल्याने तुमचे पोट थंड होते आणि अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतात. हा रस हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि मधुमेह देखील नियंत्रित करतो. चला तर मग कोणत्या भाजीचा रस पिणे अधिक फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात या भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
bottle gourd juice
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 30, 2025 | 11:57 PM

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण या ऋतूत अनेकदा लोकांना थंड पेये आणि कोल्ड्रिंक्स पिणे आवडते, परंतु या सर्व गोष्टींपेक्षा तुम्ही जर या भाजीचा रस प्यायलात तर ते तुमच्या शरीरासाठी जास्त फायदेशीर ठरू शकते. कारण यांच्या सेवनाने तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला पोषक तत्वे मिळतात. तसेच या भाजीचा रस नैसर्गिक ऊर्जा पेय म्हणून ओळखले जाते जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस फायद्याचा ठरु शकतो. चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात कोणत्या भाजीचा रस आरोग्यासाठी वरदान ठरेल.

उन्हाळ्यात अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता भासते, ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात दुधी भोपळ्याच्या रसाचा समावेश करा. कारण दुधी भोपळ्याचा रस शरीराला थंड ठेवतो आणि पाण्याची कमतरता दूर करतो. हे शरीराला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवते आणि शरीरातील पाण्याचे संतुलन राखते. त्यासोबतच दुधी भोपळ्याच्या रसात भरपूर पोषक तत्वे असतात आणि ते सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यासोबतच पोट थंड ठेवतो. दुधी भोपळ्याचा रस नियमितपणे प्यायल्याने तुमची त्वचा सुधारते. या रसात भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचन सुधारते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, आम्लता किंवा पोटाच्या इतर समस्या असतील तर भोपळ्याचा रस या समस्येपासून आराम देऊ शकतो. तसेच पोट स्वच्छ करते आणि अपचन दूर करते.

दुधी भोपळ्याचा रस त्वचेसाठी व हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी दुधीचा रस फायदेशीर ठरू शकतो. कारण उन्हाळ्यात त्वचेवर घाम आणि धूळ साचते, ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढतात. दुधी भोपळ्याच्या रसात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पाणी त्वचेला हायड्रेट करते, ज्यामुळे त्वचा चांगली राहते. तसेच सुरकुत्या देखील कमी होतात. दररोज भोपळ्याचा रस प्यायल्याने त्वचा चमकदार राहते आणि मुरुमांची समस्या कमी होते. दुधी भोपळ्याचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे खनिजे रक्तदाब नियंत्रित करतात आणि रक्त प्रवाह सुधारतात. यामुळे हृदय निरोगी राहते.

किडनीच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर

दुधी भोपळ्याचा रस किडनीच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कारण किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते, ज्यामुळे आपले शरीर तंदुरस्त राहते. दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने किडनी स्टोनपासून आराम मिळतो, कारण त्यात ड्यूरेटिक गुणधर्म भरपूर असतात.

मधुमेहाच्या रूग्णांसाठी देखील फायदेशीर

दुधी भोपळ्याचा हा रस मधुमेहाच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दुधी भोपळ्याचा रस हा एक चांगला पर्याय असू शकतो. दुधी भोपळ्याच्या रसात कॅलरीज कमी असतात आणि त्यात भरपूर पाणी असते. यामुळे शरीर ताजेतवाने होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)