Bridal Skin Care | लग्नात चमकदार चेहरा हवाय? मग ‘या’ बजेट फ्रेंडली स्कीन ट्रीटमेंट नक्की ट्राय करा!

| Updated on: Jan 04, 2021 | 4:29 PM

लग्नाच्या या माहोलात होणाऱ्या वधूसाठी ‘स्कीन ट्रीटमेंट’ हा एक चांगला पर्याय आहे.

Bridal Skin Care | लग्नात चमकदार चेहरा हवाय? मग ‘या’ बजेट फ्रेंडली स्कीन ट्रीटमेंट नक्की ट्राय करा!
Follow us on

मुंबई : दिवाळी सण संपला की सगळीकडे लग्नाची धामधूम सुरु होते. विवाहा सोहळ्यात प्रत्येकाचीच नजर नववधूवर असते. या विशेष दिवशी आपल्या चेहर्‍यावरील चमक कमी होऊ नये आणि आपल्यावर सगळ्यांच्याच नजरा खिळून राहाव्यात, यासाठी वधू आपली निरोगी ठेवण्यासाठी लग्न मुहूर्ताच्या 2 ते 3 महिन्यांपूर्वीच त्वचेवर उपचार करण्यास सुरू करते. त्वचेच्या वेगवेगळ्या उपचारांमुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरुमं, थीन लाईन्स, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते (Budget friendly skin treatment for would be bride).

लग्नाच्या या माहोलात होणाऱ्या वधूसाठी ‘स्कीन ट्रीटमेंट’ हा एक चांगला पर्याय आहे. ‘स्कीन ट्रीटमेंट’ म्हटल्यावर पहिला प्रश्न मनात येतो तो आपल्या ‘बजेट’चा… मात्र, याची काळजी करण्याची काही गरज नाही. त्वचेसाठी काही फायदेशीर तसेच, तुमच्या बजेटमध्ये फिट होणारे काही ‘प्री-ब्रायडल’ स्कीन ट्रीटमेंटची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

डर्मारोलिंग

आपल्या चेहऱ्यावर मुरुमं आणि पिग्मेंटेशन असल्यास, ‘डर्मारोलिंग’ हा एक चांगला पर्याय आहे. बर्‍याच मायक्रो नीडल अर्थात सुया असणारे हे एक हँड्स-ऑन डिव्हाईस आहे. आपल्या त्वचेवर जेल अथवा क्रीम लावून डर्मारोल फिरवला जातो. ही ट्रीटमेंट करण्यासाठी, 5 ते 6 आठवड्यांच्या दरम्यान 3 ते 6 सेशन घेणे आवश्यक असते. तथापि, हे उपचार घेण्यापूर्वी, कृपया त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. डर्मोरोलिंगच्या एका सेशनची किंमत 1500 ते 5000 रुपये इतकी आहे (Budget friendly skin treatment).

कार्बन पील

या स्कीन ट्रीटमेंटमध्ये, त्वचेवर कार्बनचा थर लावला जातो आणि लेझरद्वारे पुढील क्रिया केली जाते. कार्बन त्वचेवरील तेलाचा थर काढून टाकण्यास मदत करतो. या उपचाराने त्वचेवरील तेल आणि ब्लॅक हेडची समस्या निश्चित कमी होते. या स्कीन ट्रीटमेंटची किंमत 3000 ते 10000 दरम्यान असते. या स्कीन ट्रीटमेंटची किंमत कार्बन पीलवर अवलंबून असते.

फोटो फेशियल

फोटो फेशियल हे एक नाविन्यपूर्ण तंत्र आहे. जे तीव्र लेझर लाईटसह त्वचेमध्ये कोलेजेन वाढवण्याचे कार्य करते. फोटो फेशियल स्कीन ट्रीटमेंट करण्यास किमान 50 मिनिटे लागतात. फोटो फेशियलमुळे मुरुमं, डार्क स्पॉट्स, डार्क सर्कल या समस्या कमी होतात. यासाठी स्कीन ट्रीटमेंटसाठी प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या. लग्नाच्या 3 ते 5 महिन्यांपूर्वी या स्कीन ट्रीटमेंटला प्रारंभ करावा लागतो. यातील एका सेशनची किंमत 2000 ते 2500 रुपये इतकी असते.

(Budget friendly skin treatment for would be bride)

(टीप : कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

हेही वाचा :