वात पळेल दूर, ही टेस्टी भाजी हिवाळ्यात आरोग्यदायी, एकदा नक्कीच खा..

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातच आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे शरीर अधिक निरोगी राहिल. त्यातच एक अशी भाजी आहे, ज्याचा आहारात समावेश केला तर हिवाळ्यात निरोगी राहण्यास मदत होईल.

| Updated on: Nov 28, 2026 | 1:32 PM
1 / 5
सध्या हिवाळा सुरू असून काही भागात कडाक्याची थंडी पडली आहे. बऱ्याच लोकांना वातेचा त्रास होतो. अशावेळी एक जबरदस्त अशी भाजी आहे, ही भाजी खाल्ल्याने वात जवळही फिरत नाही, या भाजीचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा.

सध्या हिवाळा सुरू असून काही भागात कडाक्याची थंडी पडली आहे. बऱ्याच लोकांना वातेचा त्रास होतो. अशावेळी एक जबरदस्त अशी भाजी आहे, ही भाजी खाल्ल्याने वात जवळही फिरत नाही, या भाजीचा आपल्या दररोजच्या आहारात समावेश करा.

2 / 5

हिवाळ्यात सुरण कंदाची भाजी खाणे फायदेशीर ठरते. ज्यामुळे वातेचा त्रास कायमच दूर होईल. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही भाजी तयार करू शकता. याकरिता कंद धुवून घ्या. सुरण कंदचे बारीक बारीक भाग करून घ्या. चिप्स सारखे बारीक करून घ्या. जाड नको.

3 / 5

हे घरातच दिवसभर वाळत ठेवा. त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट करा. त्यात काजू किंवा शेंगदाणेही बारीक करून घ्या. लसून, जिरे, कोथिंबीरची पेस्ट तयार करा. टोमॅटो किंवा पालकची पेस्टही मिक्स करू शकता.

4 / 5

बाकी लाल तिखट, धनी पावडर, तेल, हळद आणि मीठ हे साहित्य वापरा. हे चिप्स तळून घ्या. मग त्याच तेलात मोहरी, जिरे आणि कांदा खोबऱ्याची पेस्ट टाका. ही व्यवस्थित परतून घ्या ती लाल झाली की, सर्व मसाले त्यात मिक्स करा.

5 / 5

त्यानंतर कंद त्यात घाला. तुम्हाला भाजी जितकी पातळ हवी आहे, तेवढे पाणी टाका. उकळी येऊपर्यंत भाजी शिजू द्या. बघा तुमची ही झणझणीत भाजी तयार होईल. ही भाजी खाल्याने वातेचा त्रास होत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us