Shooping : 500 ची जीन्स अन् 300 चा शर्ट, या मार्केटमध्ये ब्रँडेड कपडे मिळतात अगदी कवडीमोल भावात
Shooping : तरुणांमध्ये जिन्सची क्रेझ कायम असते. पण मॉल आणि शॉपमध्ये शॉपिंग करणं खर्चीक असत. पण प्रत्येक शहरात असे काही ठिकाण असतात जेथे स्वस्त कपडे मिळतात. तर असं एक मार्केट आहे, जिथे 500 रुपयांमध्ये जिन्स आणि 300 रुपयांमध्ये जिन्स मिळते...

Shooping : आता ज्या मार्केटबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ते मार्केट मध्य प्रदेश येथील रीवा शहरात आहे. रीवा शहरात गणेशोत्सवा दरम्यान बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी वाढली आहे. सणासुदीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये लोकांची गर्दी उसळली असून, विशेषतः कपड्यांच्या दुकानांमध्ये आणि सेलमध्ये तरुणांचा ओढा दिसून येत आहे. शिल्पी प्लाझा आणि खन्ना चौकाजवळ मिळणाऱ्या स्वस्त आणि फॅशनेबल कपड्यांच्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. तरुणांमध्ये जीन्सचं क्रेझ कायम असून, त्यांची शर्ट, टी-शर्ट किंवा कुर्त्याला देखील पसंती असते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते तरुणांपर्यंत याची मागणी कायम आहे. रीवा महानगरपालिकेजवळ खन्ना चौकात भरणार्या बाजारात फक्त 500 रुपयांत जीन्स मिळत असल्याचा सांगितलं जात आहे. येथे 300 ते 500 रुपयांच्या दरम्यान शर्ट, टी-शर्ट आणि कुर्ते देखील उपलब्ध आहेत.
फूटपाथवर दुकान लावणारे व्यापारी महेंद्र खान यांच्या मते, कपड्यांची किंमत सुमारे 200 रुपयांपासून सुरू होते आणि 1 हजार रुपयांच्या बजेटमध्येही ग्राहक विविध प्रकारचे कपडे खरेदी करू शकतात. या बाजारात जीन्सव्यतिरिक्त लोअर, पँट-शर्ट आणि टी-शर्ट देखील मिळतात. एवढंच नाही तर, काश्मीर आणि लुधियानाहून आलेले व्यापारी गरम कपड्यांची विक्री करतात. व्यापाऱ्यांच्या मते, हा रीवातील जुन्या मार्केटपैकी एक असून सणासुदीच्या हंगामात येथे खरेदी वाढते. सध्या सुरू असलेली सेल फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
ओम कलेक्शनमध्ये विशेष ऑफर
राज विलास हॉटेलसमोर असलेल्या ‘ओम कलेक्शन’मध्येही तरुणांसाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. येथे जीन्स 400 रुपयांना आणि शर्ट 300 रुपयांपासून मिळत असल्याची माहिती मिळाली आहे. या ऑफरची माहिती समोर आल्यानंतर विशेषतः कॉलेजचे तरुण-तरुणी आणि नोकरदार तरुणांची गर्दी पाहायला मिळत आहे.
बजेट-फ्रेंडली कलेक्शन
दुकान मालक प्रकाश केसवानी यांच्या मते, ग्राहकांचं बजेट लक्षात घेऊन विशेष कलेक्शन तयार करण्यात आलं आहे. यात जीन्स, शर्ट, टी-शर्ट आणि ट्रेंडी कपड्यांचा समावेश आहे. त्यांच्या मते, ग्राहक सुमारे हजार रुपयांमध्ये संपूर्ण सणासुदीचा ड्रेस कलेक्शन तयार करू शकतात.