Diabetic Care Tips: डायबिटीजवर ही पाने आहेत रामबाण उपाय, ब्लड शुगर करते कंट्रोल

चुकीचा आहार आणि बदलती जीवनशैली यामुळे अनेक लोक मधुमेहाला बळी पडत आहेत. हा रोग शरीराच्या इतर भागांवर देखील परिणाम करतो. रोज व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे. काही घरगुती उपाय करुन तुम्ही डायबेटीज नियंत्रणात आणू शकता. काही पाने साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील खूप प्रभावी आहेत.

Diabetic Care Tips: डायबिटीजवर ही पाने आहेत रामबाण उपाय, ब्लड शुगर करते कंट्रोल
diabetes
| Updated on: Nov 23, 2023 | 9:53 PM

मधुमेहाची समस्या जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील मधुमेह हा आता अनेकांना होत आहे. हा एक असाध्य रोग आहे. मधुमेह या आजाराचा परिणाम डोळे, हृदय, किडनी आणि त्यानंतर संपूर्ण शरीरावर होतो. हा आजार शरीराला आतून पोकळ करून अशक्त बनवतो. यापासून मुक्त होण्यासाठी, शक्य तितक्या नैसर्गिक स्त्रोतांचा प्रयत्न केला पाहिजे. कारण हा आजार वेळेत नियंत्रणात आला तर तो मुळापासून दूहृर करता येऊ शकतो. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे मधुमेह नियंत्रणाय येऊ शकतो.

मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीपण बिघडते. न्यूरोलॉजिकल आणि रक्ताभिसरण प्रणालीवरही परिणाम होऊ शकतो. अनेक गंभीर आजार होण्याचा धोका असतो.

कडुलिंबाची पाने

अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध कडुनिंबाच्या पानांचे सेवन शरीरातील रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी उपयुक्त ठरते. कडुलिंबाची पाने चघळण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा.

अश्वगंधाची पाने

अश्वगंधाच्या पानांपासून बनवलेली औषधे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. टाईप 2 मधुमेहामध्ये अश्वगंधा खूप फायदेशीर आहे. त्याची पावडर आणि गोळ्याही बाजारात उपलब्ध आहेत. यात अनेक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, इतकेच नाही तर आयुर्वेद मानतो की अश्वगंधा अँटीबायोटिक रसायनांनी समृद्ध आहे.

कढीपत्ता

अँटी-ऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध कढीपत्ता शरीरातील उच्च रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. त्यामुळे जर मधुमेहाचा त्रास असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी 6 ते 8 हिरव्या कढीपत्त्याचे सेवन करा.

मेथीची पाने

मेथीची पाने कॅल्शियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन ए, बी 6 आणि व्हिटॅमिन सी, फॉलिक ऍसिड, रिबोफ्लेविन, तांबे, पोटॅशियम यांसारख्या अनेक गुणधर्मांचा खजिना आहे. जे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कसुरी मेथीही तितकीच फायदेशीर आहे.