अमेरिकेत नियोजित वेळेआधीच जन्माला येताय मुले, डॉक्टर ही हैराण

अमेरिकेत नियोजित वेळेच्या आधीच बाळ जन्माला येत असल्याने सरकारही चिंतेत आहे. डॉक्टरांनाही यामागचे कारण समजू शकलेले नाहीये. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. मुले वेळेच्या आधीच जन्माला येत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अमेरिकेत नियोजित वेळेआधीच जन्माला येताय मुले, डॉक्टर ही हैराण
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 9:42 PM

Birth time decrease : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक गोष्टी अंतुलित होत चालल्या आहे. अमेरिकेत अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांच्या जन्माबाबत एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांनाही यामागचे कारण कळत नाहीये. अमेरिकेत नियोजित वेळेच्या 3 आठवडे आधी बाळांचा जन्म होत आहे. असे एका संशोधनात पुढे आले आहे. या अहवालानुसार, अमेरिकेत 40 आठवड्यांचा गर्भधारणा कालावधी आता 37 आठवड्यांवर आला आहे. ज्यामुळे मुलांचा जन्म आधीच होऊ  लागला आहे. डॉक्टरांना ही या मागचे कारण शोधता येत नाहीये.

मुदतपूर्व जन्म दर 12 टक्क्यांनी वाढला

2014 ते 2022 या कालावधीत नियोजित वेळेच्या आधी बाळांचा जन्मदर 12 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे बाळ आणि आई दोघांनाही त्रास होत आहे. आधीच मुलांचा जन्म झाला तर बाळाला संसर्ग, श्वसन आणि पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

वॉशिंग्टन इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्सच्या अहवालानुसार, १५ ते १९ वयोगटातील जन्मदर एका वर्षात ८% ने कमी झाला आहे. 1991 पासून ते सातत्याने कमी होत आहे. आशियाई-अमेरिकन महिलांमध्ये जन्मदर 8%, हिस्पॅनिक महिलांमध्ये 3% आणि गोऱ्या महिलांमध्ये 6% कमी झाला आहे. तर सिझेरियन प्रसूतीमध्ये ३२% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अमेरिकेत सुमारे 36 लाख मुलांचा जन्म झाला. 2019 मध्ये ती सुमारे 38 लाख होती. 2007 मध्ये हा आकडा सुमारे 43 लाख होता.

बाळाच जन्म वेळेच्या आधी झाला तर त्यांना अनेकजा एनआयसीयू मध्ये ठेवावे लागते. वेळेच्या आधी जन्माला आलेल्या बाळ बहुतेकचा अशक्त असते.

चीन आणि उत्तर कोरियाच्या वेगवेगळ्या समस्या

अमेरिकेत तीन आठवड्यांपूर्वी बाळाचा जन्म होत असताना चीन आणि उत्तर कोरिया या दोन देशांमध्ये मात्र वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहेत. मुलांच्या जन्माच्या कमी संख्येमुळे येथील सरकार चिंतेत आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी स्वत: लोकांना लग्न करा आणि अधिक मुले जन्माला घालण्याचे सांगितले आहे. कमी जन्मदरामुळे उत्तर कोरियाचे शासक किम जोंग यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.