Heart blockage
Image Credit source: Tv9 Network
हार्ट ब्लॉकेज, ज्याला कोरोनरी आर्टरी डिसीज असेही म्हणतात, ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये प्लेग जमा होऊन त्या अरुंद होतात, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे हृदयाला नुकसान होऊ शकते. वेळीच निदान आणि उपचार न झाल्यास हृदयविकाराचा झटका किंवा इतर गंभीर आजारांची गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे हार्ट ब्लॉकेजच्या लक्षणांबद्दल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, हार्ट ब्लॉकेजच्या काही लक्षणांबद्दल जाणून घेऊया…
हार्ट ब्लॉकेजची लक्षणे काय आहेत?
हार्ट ब्लॉकेजची लक्षणे व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. तथापि, काही सामान्य लक्षणे अशी असू शकतात. ही लक्षणे महिनाभर आधी दिसू लागतात…
वाचा: शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कसे कळते? त्वचेवरील ही लक्षणे देतील इशारा
- छातीत दुखणे: हे दुखणे दाबल्यासारखे, जळजळ किंवा तीव्र स्वरूपाचे असू शकते. शारीरिक हालचाल, तणाव किंवा जेवणानंतर हे दुखणे अधिक तीव्र होऊ शकते.
- श्वास फुलणे: हलक्या शारीरिक हालचालींनंतरही श्वास फुलणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.
- थकवा: विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवणे.
- चक्कर येणे: उभे राहताना किंवा अचानक हालचाल केल्यावर चक्कर येणे किंवा बेशुद्ध होणे.
- पायांमध्ये दुखणे: विशेषतः चालताना पायांमध्ये दुखणे.
- घाम येणे: कोणत्याही कारणाशिवाय जास्त घाम येणे.
- अपचन: वारंवार अपचन किंवा छातीत जळजळ जाणवणे.
हार्ट ब्लॉकेजची कारणे कोणती?
- उच्च रक्तदाब: उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ब्लॉकेजचा धोका वाढतो.
- उच्च कोलेस्टरॉल: उच्च कोलेस्टरॉल हे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेग जमा होण्याचे प्रमुख कारण आहे.
- धूम्रपान: धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि प्लेगच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळते.
- मधुमेह: मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते.
- कौटुंबिक इतिहास: जर तुमच्या कुटुंबात कोणाला हृदयविकार असेल, तर तुम्हालाही त्याचा धोका जास्त असतो.
- लठ्ठपणा: लठ्ठपणा हा उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टरॉल आणि मधुमेह यांसारख्या आजारांमुळे येतो. हे आजार वाढले की हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता असते.
तुम्हाला वरील कोणतीही लक्षणे जाणवली तर तुम्ही एंजियोग्राफी करणे गरजेचे आहे. यामध्ये हार्ट ब्लॉकेज असल्याचे कळते.