शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कसे कळते? त्वचेवरील ही लक्षणे देतील इशारा
कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर काही बदल दिसू लागतात. यामध्ये काही लक्षणे आहेत. आता ही लक्षणे कोणती चला जाणून घेऊया...

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. परंतु त्याची जास्त मात्रा गंभीर समस्या निर्माण करू शकते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर अनेक लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे ओळखून वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल जाणून घेऊया.
कोलेस्ट्रॉलचे प्रकार
शरीराला कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असते: चांगले (HDL) आणि वाईट (LDL). वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढल्याची अनेक लक्षणे त्वचेवरही दिसतात. ही लक्षणे ओळखून उपचार करणे महत्त्वाचे आहे. चांगले कोलेस्ट्रॉल वाईट कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तसेच शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करावा. जोपर्यंत चांगले कोलेस्ट्रॉल जास्त आहे, तोपर्यंत वाईट कोलेस्ट्रॉल जास्त नुकसान करत नाही. मात्र, वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यास त्वचेवर काही लक्षणे दिसतात, जी दुर्लक्ष करू नयेत.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्वचेवर काही बदल दिसू लागतात. यामध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो:
- पिवळे किंवा पांढरे डाग: त्वचेवर, विशेषतः डोळ्यांभोवती, कोपर, गुडघे किंवा टाचांवर पिवळे किंवा पांढरे डाग किंवा गाठी दिसू शकतात.
- त्वचेचा रंग बदलणे: त्वचेच्या रंगात बदल होऊ शकतो.
- गाठ येणे: डोळ्यांभोवती किंवा त्वचेच्या इतर भागांवर गाठी तयार होऊ शकतात. या गाठी उपचारानंतर नाहीशा होतात.
- लाल चट्टे किंवा खाज येणे
- पापण्यांवर किंवा त्वचेवर पिवळ्या-नारिंगी रंगाची त्वचा वाढू लागणे.
जर तुम्हाला वरील लक्षणे जाणवत असतील, तर तातडीने कोलेस्ट्रॉलची तपासणी करून घ्यावी. यासाठी खालील उपाय करावेत:
दैनंदिन जीवनात बदल: जीवनशैली आणि आहारात बदल करावा. व्यायाम सुरू करावा किंवा सकाळ-संध्याकाळ चालणे सुरू करावे.
आहार: फॅटयुक्त पदार्थांचे सेवन करावे, ज्यामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रोटीन यांचा समावेश आहे.
वजन नियंत्रण: वजनावर नियंत्रण ठेवावे.
व्यसनमुक्ती: दारू आणि धूम्रपान पूर्णपणे बंद करावे.
या उपायांमुळे सुधारणा न झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
