
बाजारातून सुका मेवा खरेदी करताना आपण हमखास बदाम घेतो, कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र, हल्ली बाजारात असली दिसणारे पण बनावट मोठ्या प्रमाणावर विकले जात आहेत. हे बदाम पाहायला खर्या बादामासारखेच दिसतात, पण त्यांच्यात पोषणमूल्ये नसतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
त्यामुळे खरे आणि बनावट बदाम यामध्ये फरक ओळखणं अत्यावश्यक आहे. यासाठी काही सोपे घरगुती ट्रीक्स वापरता येतात, जे कोणत्याही एक्सपेरीमंटची शिवाय तुम्ही करू शकता.
पहिली आणि सोपी ट्रिक : बनावट बदाम ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते हातावर रगडून बघणे.जर बादामाच्या रगडल्यावर हातावर रंग आला, तर समजा ते बनावट आहेत. कारण खऱ्या बदामावर कोणतीही बाह्य रंगत असत नाही. ते रगडल्यावर कोणताही रंग निघत नाही.
दुसरी सोपी ट्रिक : बदाम खरे की खोटे हे ओळखण्यासाठी दुसरी सोपी पद्धत म्हणजे त्यांना पाण्यात टाकणे. खरे आणि ताजे बदाम पाण्यात लगेच बुडतात, तर जुने, खराब किंवा बनावट बदाम पाण्यावर तरंगतात. त्यामुळे खरेखुरे बादाम शोधण्यासाठी हा सहज आणि प्रभावी उपाय आहे.
तिसरी सोपी ट्रिक : बदाम फ्रेश आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक घरगुती पण वैज्ञानिक पद्धत म्हणजे ‘पेपर टेस्ट’. एक बदाम घ्या आणि तो साध्या पेपरमध्ये गुंडाळा. मग हलक्या हाताने त्याला दाबा. जर तो खरा बदाम असेल तर काही वेळात कागदावर तेलाचे डाग दिसू लागतील. बनावट बदाम मात्र तेल सोडत नाहीत आणि पेपर कोरडाच राहतो.
चौथी सोपी ट्रिक : बदाम विकत घेताना त्याच्या पॅकिंगवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे ते म्हणजे ब्रँडचे नाव, पोषणमूल्य, बेस्ट बिफोर तारीख, आणि उत्पादनाची माहिती नीट वाचा. अनोळखी किंवा स्थानिक अनब्रँडेड विक्रेत्यांकडून बदाम खरेदी टाळा. कारण नकली बदाम फक्त चव बिघडवतात असं नाही, तर ते आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात.
पाचवी सोपी ट्रिक : खऱ्या बदामामध्ये ताजा वास असतो आणि चव थोडीशी गोडसर वाटते. तर दुसरीकडे, बनावट किंवा खराब झालेल्या बदामांमध्ये गंधच नसतो किंवा सडलेल्या वस्तूसारखा वास येतो. चव कडवट, बासलेली किंवा कृत्रिम वाटते. हा फरक लक्षात घेऊन तुम्ही खऱ्या आणि नकली बदामामधील अंतर सहज ओळखू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
——————————————————————————————–
——————————————————————————————–
——————————————————————————————–