
आजकालच्या या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे फार कठीण झाले आहे. कारण व्यस्त जीवनशैलीमुळे लोकं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत राहतात. पण स्वतःसाठी थोडा वेळ काढणे खूप महत्वाचे आहे, जे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास देखील मदत करेल. अशा वेळेस, अनेकांना सकाळी उठून मॉर्निंग वॉक करायला जाणे आवडते, कारण यामुळे तुम्हाला मोकळ्या हवेत चालल्याने बरे वाटते आणि तंदुरुस्त राहण्यासही मदत होते.
मॉर्निंग वॉकला जाणे सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की जर तुम्ही व्यायाम करू शकत नसाल तर तुम्ही काही वेळ मॉर्निंग वॉकला जाऊ शकता. पण तुम्हाला माहिती आहे का की कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुम्हाला तो कसा करायचा हे माहित असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, मॉर्निंग वॉक करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. कारण या चुका पुन्हा पुन्हा केल्याने चालण्यापासून फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.
अनेकदा लोकं मॉर्निंग वॉकला जाण्यापूर्वी पाणी पिण्यास विसरतात. तुम्हाला तहान लागली नसल्यामुळे असे होऊ शकते, पण तुम्हाला माहिती आहे का की डिहायड्रेशन तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने तुम्ही तो व्यायाम चांगल्या प्रकारे करू शकता आणि असे केल्याने तुमच्या शरीरालाही अधिक फायदा होईल.
बहुतेक लोकं सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मॉर्निंग वॉकला जातात. पण त्याआधी तुम्ही काहीतरी खाणे गरजेचे आहे. जर तुम्हालाही असे वाटत असेल की रिकाम्या पोटी चालणे आवश्यक आहे तर तुम्ही चुकीचे आहात. कारण सकाळी उठल्याबरोबर थकवा जाणवणाऱ्या लोकांनी फिरायला जाण्यापूर्वी काहीतरी खावे. जर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी असेल, तर काहीही न खाता मॉर्निंग वॉकला गेल्याने तुम्हाला अशक्तपणा किंवा चक्कर येऊ शकते. सकाळी तुम्ही काही पदार्थ खाऊ शकता ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळेल. फळे खाल्ल्यानंतर मॉर्निंग वॉकला जाणे फायदेशीर ठरते.
काही लोकांना दिवसाची सुरुवात कॉफीने करायला आवडते पण जर तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल तर कॉफी पिऊ नये. कारण कॉफीमध्ये असलेले कॅफिन तुम्हाला डिहायड्रेटेड वाटू शकते. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते ज्यामुळे तुमचे चालणे कंटाळवाणे होऊ शकते.
मॉर्निंग वॉकला जाताना आरामदायी बूट आणि कपडे घालावेत. चालताना तुम्ही सोबत पाणीही ठेवावे. यासोबतच जर तुम्ही वेगाने चालत असाल तर त्यापूर्वी 5 मिनिटे स्ट्रेचिंग करणे फायदेशीर ठरते. तसेच योग्य वेगाने चाला. जेणेकरून तुम्ही लवकर थकणार नाही.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)