केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चिया बियाणे वरदानापेक्षा कमी नाही, त्यांचा अशा प्रकारे करा वापर

अनहेल्दी जीवनशैली आणि बदलत्या वातावरणामुळे केस गळणे आणि केसांना कोरडेपणा येणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर चिया बियाणे यासाठी फार उपयुक्त आहे. आम्ही तुमच्यासाठी केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी या चिया बियाणांची कशी मदत होईल चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊयात.

केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चिया बियाणे वरदानापेक्षा कमी नाही, त्यांचा अशा प्रकारे करा वापर
Hair benefits of chia seeds
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 8:51 PM

चिया बिया दिसायला जरी लहान असले तरी त्यांचे असंख्य फायदे आहेत. ते तुमच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केसांसाठी असो, पचनक्रिया असो, शरीर थंड ठेवणे असो… किंवा केसांची वाढ असो. चिया बिया तुमच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय आहेत. आजकाल चिया बिया खूप ट्रेंडी आहेत. लोक चिया बियाणे पाण्यात भिजवून त्याचे सेवन करतात. वजन कमी करू करणाऱ्यांसाठी देखील हे फायदेशीर आहे. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चिया बिया केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत.

खरंतर, चिया बियांमध्ये ओमेगा-३, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. जर तुम्ही चिया बियांचा योग्य प्रकारे वापर केला तर ते केस लांब आणि मऊ होतात. केस गळण्याची समस्या देखील कमी होते. जर तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य सुधारायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला केसांसाठी चिया बिया वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

चिया बियांच्या तेलाने केसांना मालिश करा

केसांच्या वाढीसाठी चिया बियांच्या तेलाचा मसाज हा सर्वात प्रभावी आणि सोपा मार्ग आहे. चिया बियांच्या तेलात ओमेगा-२ आणि फॅटी ॲसिड असतात, जे केसांच्या रोमांना पोषण देतात आणि रक्ताभिसरण वाढविण्यास देखील मदत करतात. त्याच वेळी फॅटी ॲसिड मुळे केस निरोगी होतात, ज्यामुळे केसांची वाढ होते. तुम्हाला फक्त थोडेसे तेल गरम करायचे आहे आणि ते तुमच्या स्कॅल्पवर चांगले लावायचे आहे आणि मालिश करायचे आहे. तेल तुमच्या केसांवर 30 मिनिटे राहू द्या जेणेकरून ते स्कॅल्पमध्ये चांगले शोषले जाईल. यानंतर, सल्फेट फ्री शॅम्पूने केस धुवा.

चिया बियाण्यांचा हेअर मास्क

चिया बियांमध्ये काही प्रमाणात प्रथिने देखील आढळतात, जी केस सरळ करण्यासाठी फायदेशीर आहे. चिया बियांचा हेअर मास्क लावल्याने केसांची मुळे मजबूत होतातच, शिवाय केस मऊ आणि सरळ वाढतात. यासाठी तुम्हाला 2 चमचे चिया बिया 30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. जेव्हा ते जेलसारखे बनते तेव्हा ते काढून बारीक करून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये नारळ तेल आणि मध मिक्स करा, ज्यामुळे केसांना चमक येईल. आता हा हेअर मास्क मुळांपासून टोकांपर्यंत केसांना लावा आणि 30 मिनिटांनी धुवा.

चिया बिया आणि लिंबू

चिया बिया आणि लिंबूने केस धुणे देखील खूप प्रभावी आहे. यासाठी प्रथम चिया बिया 20-30 मिनिटे भिजवा आणि ते जेलसारखे झाल्यावर त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करा. नंतर केस शॅम्पूने धुतल्यानंतर, चिया बिया आणि लिंबू यांचे मिश्रण मुळांपासून टोकापर्यंत लावा. काही वेळ मसाज केल्यानंतर 5-10 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने केस धुवा. हे मिश्रण स्कॅल्प पूर्णपणे स्वच्छ करते, ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो. तसेच, स्कॅल्पची पीएच पातळी देखील संतुलित राहते.

चिया सीड्स आणि कोरफडीचा सीरम

केसं फ्रिजी होऊ नये यासाठी तुम्ही चिया बिया आणि कोरफडीचा सीरम वापरू शकता. चिया बिया आणि कोरफडीचे मिश्रण केसांना मऊ, चमकदार करते. चिया बियाणे केसांच्या वाढीस देखील मदत करते. यासाठी, अर्धा कप कोरफडीच्या सीरममध्ये 1 चमचा चिया बिया मिक्स करा. त्यात तुमच्या आवडीचे कोणतेही आवश्यक तेल टाका. आता हे मिश्रण केसांना लावा. काही तास केसांवर तसेच राहू द्या आणि नंतर केस धुवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.).