Tea Benefits | आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरू शकतो चहा, फक्त त्यात मिसळा ‘हा’ घटक!

| Updated on: Feb 25, 2021 | 10:16 AM

आपल्या पैकी अनेकांना चहाची इतकी तलफ असते की, जर अशा लोकांना वेळेवर चहा मिळाला नाही तर, डोकेदुखी सुरु होऊ लागते.

Tea Benefits | आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरू शकतो चहा, फक्त त्यात मिसळा ‘हा’ घटक!
लवंगाचा चहा
Follow us on

मुंबई : आपल्या पैकी अनेकांना चहाची इतकी तलफ असते की, जर अशा लोकांना वेळेवर चहा मिळाला नाही तर, डोकेदुखी सुरु होऊ लागते. परंतु, अधिक चहा आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे नेहमीच म्हटले जाते. सतत चहा पिण्यामुळे पोटात गॅस, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. जर, तुम्हालाही चहा पिण्यास आवडत असेल, तर नेहमीच्या चहाऐवजी लवंग युक्त चहा प्या. हा चहा आपल्या आरोग्यासाठी औषध म्हणून काम करेल आणि आपल्या शरीराचे बाह्य आणि अंतर्गत आजारांपासून संरक्षण करेल. चला तर, जाणून घेऊया लवंग चहाचे फायदे…(Health benefits of clove tea)

लवंग युक्त चहाचे फायदे :

– लवंग चहा पाचन समस्या दूर करण्यासाठी फार प्रभावी आहे. लवंग चहा पाचन तंत्रास उत्तेजित करतो आणि आम्लपित्ताची समस्या कमी होते. आपण काहीही खाण्यापूर्वी अर्धा तास आधी लवंग चहा प्यायल्यास, अन्न सहज पचते.

– लवंग चहा दातदुखीपासून मुक्त होण्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. या व्यतिरिक्त, शरीराच्या वेदना दरम्यान लवंगाचा चहा पिणे देखील खूप आरामदायक आहे.

– सर्दी टाळण्यासाठी लवंग चहा खूप फायदेशीर आहे. लवंगाचा प्रभाव गरम आहे, म्हणून थंडीच्या दिवसात किंवा हंगामी बदलांच्या वेळी दिवसांतून दोन ते तीन वेळा हा चहा प्याल्याने सर्दी, खोकला आणि पडशापासून बचाव होतो.

– लवंग चहा सायनस किंवा छातीत कफ या समस्या दूर करण्यात देखील उपयुक्त आहे. जर आपल्याला सायनसची तक्रार असेल, तर दररोज सकाळी लवंग चहा पिण्यामुळे संसर्ग कमी होतो आणि सायनस देखील कमी होतो (Health benefits of clove tea).

– लवंगामध्ये असलेले युजेनॉल श्वासोच्छवासाच्या समस्येमध्ये त्वरित आराम प्रदान करते. दिवसातून तीन वेळा लवंग चहा प्यायल्याने दम्याच्या रूग्णांना चांगला फायदा होतो.

कसा बनवायचा लवंग चहा?

एक कप पाण्यात दोन ते तीन लवंगा उकळा. यानंतर, चतुर्थांश लहान चमचा चहा पावडर घाला. हा चहा गाळल्यानंतर त्यात मध घालून प्या.

लवंगाचे औषधी गुणधर्म

जरी सर्व हवामानात लवंगाचा वापर केला जातो, परंतु तपमान बदलत असल्याने, हिवाळ्यात लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. हे पोटॅशियम, प्रथिने, लोह, सोडियम, कर्बोदके, कॅल्शियम आणि हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण देखील समृद्ध आहे. लवंगामध्ये व्हिटामिन ए आणि सी देखील आढळतात. तसेच त्यात मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर प्रमाणत आढळतात.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of clove tea)

हेही वाचा :

Food Tips | आयुर्वेद सांगतंय मधासोबत ‘या’ गोष्टी खाऊ नका एकत्र, अन्यथा आरोग्याला होऊ शकते हानी!

High Blood Pressure | उच्च रक्तदाबाची दोन लक्षणे, डोळे आणि चेहऱ्यावरुन ओळखा आजार