High Blood Pressure : हिवाळा सुरु झाला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात बदलत्या वातावरणामुळे अनेक समस्या उद्भवतात. लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात सर्दी आणि खोकला आता सामान्य झाला आहे. कोरोनानंतर आता अनेक आजारांचा सामना लोकांना करावा लागत आहे. प्रतिकारशक्ती कमकुवत तर झालीच आहे पण सोबत सांधेदुखी आणि दमा सारखे त्रास देखील लोकांना होत आहे. हिवाळ्यात आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे उच्च रक्तदाब. उन्हाळ्यात उच्च रक्तदाब कमी होतो पण हिवाळ्यात मात्र तो वाढतो.
तज्ज्ञ सांगतात की, थंड हवामानाचा रक्तदाबावर परिणाम होतो. वयोवृद्ध लोकांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण त्यांना याचा अधिक धोका असतो. हिवाळ्यात रक्तदाब का वाढतो. काय आहेत त्याची कारणे जाणून घ्या.
- थंडीत धमन्या आणि शिरा आकसतात. त्यामुळे काही भागात रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक काम करावे लागते. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते.
- आहार उत्तम तर आरोग्य देखील उत्तम राहते. हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात खा. हिवाळ्यात मुख्यतः हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर कमी चरबीयुक्त अन्न, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांचे अधिक सेवन करा.
- कॉफीचे जर तुम्ही जास्त सेवन करत असाल तर त्यामुळे देखील रक्तदाब अनियंत्रित होतो.
- चीज, टोमॅटो सॉस सारख्या फ्रोझन गोष्टी खाणे टाळले पाहिजे. यामध्ये साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियम जास्त असते. त्याऐवजी ताज्या भाज्या आणि फळे खा.
- शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवणारे पदार्थ खाणे टाळा. यामुले रक्तदाब वाढण्याचा धोका असतो.
- हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज योगा आणि व्यायाम करु शकता. पण यामुळे हृदयावर अधिक ताण येणार नाही याची काळजी घ्या.