हिवाळ्यात व्यायाम करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा अडचणीत येऊ शकता
हिवाळ्यात व्यायाम करताना तुम्हाला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण हिवाळ्याच आपले स्नायू घट्ट झालेले असतात. अशा परिस्थितीत व्यायाम करताना कोणत्याही भागावर ताण येऊ शकतो. ज्यामुळे अधिक अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर व्यायाम करत असाल तर खालील गोष्टींची काळजी घ्या.

मुंबई : भारताच्या अनेक भागात आता थंडी वाढू लागली आहे. जम्मू-काश्मीरमधील तलाव गोठले आहेत. इतकंच नाही तर दक्षिण भारतात देखील आता थंडीने जोर पकडला आहे. थंडीमुळे सकाळी लवकर उठण्यासाठी आपण टाळाटाळ करतो. कारण सकाळी खूप चांगली झोप लागते. पण तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर तुम्हाला अधिक सक्रिय राहावे लागेल. थंडीत तुमते शरीरात उब कशी राहिले याकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज असते. हिवाळ्यात त्याप्रमाणे आहारात देखील बदल केला पाहिजे. पण हिवाळ्यात व्यायाम करताना किंवा धावायला जात असाल तर त्यावेळी काळजी घेण्याची गरज असते.
धावायला जात असाल किंवा व्यायाम करत असाल तर तुम्हाला तुम्ही एक काळजी घेतली पाहिजे. या दरम्यान जर तुम्हाला शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हिवाळ्यात अधिक व्यायाम करु नये. हृदयावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
- तुम्ही हिवाळ्यात जर सकाळी वर्कआउट करत असाल तर त्याआधी तुम्हाला आधी काही वेळ वॉर्म अप करणे महत्त्वाचे आहे. थंड तापमान असल्याने स्नायू घट्ट होतात, ज्यामुळे दुखापत होण्याचा धोका असतो. त्यामुळे आधी वॉर्म अप करावे.
- थंडीत व्यायाम करताना योग्य कपडे देखील घातले पाहिजे. शरीर उबदार ठेवण्यासाठी तसेच कपडे घालावे.
- थंडीत धावताना हातात हातमोजे आणि पायात शूज घाला. ज्यामुळे हात आणि पाय उबदार राहतील. कान झाकण्यासाठी कानटोपीचा वापर करु शकता.
- थंडीत जास्त तहान लागत नाही. पण अशा वेळी तुम्हाला स्वतःला हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. शरीर निर्जलीकरण होऊ नये याची काळजी घ्या. व्यायाम करणाना पुरेसे पाणी प्या.
- व्यायाम करताना कोणत्याही भागात दुखत असेल तर व्यायाम करु नका. आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- व्यायाम करताना अधिकचा व्यायाम करु नका. एखाद्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. अन्यथा शरीरातील इतर अवयवांवर ताण येण्याचा धोका असतो. त्यामुळे काळजी घ्या.
