मे महिन्यात मित्रांसोबत फिरायला जाताय? तर हिमाचलमधील ‘ही’ ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वोत्तम

उन्हाळ्यात लोक थंड हवामान असलेल्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात. पण यावेळी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील अनेक ठिकाणी खूप गर्दी असते. अशा वेळेस तुम्हाला जर तुमच्या मित्रांसोबत एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हिमाचल प्रदेशातील ही ऑफबीट ठिकाणे सर्वोत्तम असतील. चला तर मग त्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

मे महिन्यात मित्रांसोबत फिरायला जाताय? तर हिमाचलमधील ही ऑफबीट ठिकाणे आहेत सर्वोत्तम
Himachal Pradesh
Image Credit source: runner of art/Moment/Getty Images
| Edited By: | Updated on: May 08, 2025 | 10:55 PM

उन्हाळा ऋतू सुरू की प्रत्येकजण आपल्या कुटूंबासोबत किंवा मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन सुरू करतात. तर वाढत्या उष्णतेपासून दूर असलेल्या काही थंड ठिकाणी फिरायला जात असतात. पण यावेळी मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या असल्याने मनालीसारख्या अनेक ठिकाणी खूप गर्दी असते. गर्दीत फिरायला जाण्याचा योग्य आनंद घेता येत नाही. म्हणूनच बहुतेक लोकांना शांत ठिकाणी जायला आवडते.

जर तुम्हालाही या मे महिन्यात तुमच्या मित्रांसोबत एखाद्या शांत ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही हिमाचलमधील काही ठिकाणांना भेट देऊ शकता. या अनोख्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी कमी असते. जेणेकरून तुम्ही तिथे शांततेत वेळ घालवू शकाल आणि तुमच्या तिथे फिरण्याचा आनंद घेता येईल.

जिभी

जिभी हे तीर्थन खोऱ्यात वसलेले एक छोटेसे गाव आहे. ते मनालीपासून अंदाजे 102 किमी अंतरावर आहे. येथे खूप शांतता असते. म्हणूनच, हे हिमाचलमधील सर्वोत्तम ऑफबीट ठिकाणांपैकी एक आहे. येथे तुम्हाला पारंपारिक लाकडी घरे, पाइन आणि देवदार वृक्षांनी भरलेले मोठे जंगल आणि गावातून वाहणारी नदी पाहायला मिळेल. धबधबा पाहण्यासाठी तुम्ही पायी ट्रेकिंगला जाऊ शकता, तुम्ही जालोरी खिंडीतूनही ट्रेकिंगला जाऊ शकता. येथे तुम्ही जिभी धबधबा, चेहनी कोठी, सेरोलसर तलाव, झालारी खिंड आणि रघुपूर किल्ला यासारख्या सुंदर ठिकाणांचा अनुभव घेऊ शकता.

बारोट

 

बारोट हे मंडी जिल्ह्यात आहे. याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. येथे उहल नदी हिरव्यागार कुरणातून आणि पाइनच्या जंगलातून वाहते. येथे तुम्हाला शांत वातावरण मिळेल. गर्दी, गोंधळ आणि आवाजापासून दूर, तुम्ही येथे तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवू शकता. जर तुम्हाला मासेमारी करायला आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य असेल, कारण हे ठिकाण ट्राउट माशांसाठी ओळखले जाते. इथली उहल नदी, नार्गू वन्यजीव अभयारण्य, शानन जलप्रकल्प, लापस धबधबा आणि कोटला किल्ला खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय, बारोटमध्ये अनेक ट्रेकिंग ट्रेल्स आहेत, जे पाइन आणि देवदाराच्या जंगलातून जातात. येथे तुम्ही कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.

चिटकूल

चिटकूल हे हिमाचलमधील सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे. येथे तुम्हाला निसर्गाचे सुंदर दृश्य पाहण्याची तसेच कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करण्याची संधी मिळेल. हे ठिकाण किन्नौर जिल्ह्यात आहे. ते उंच पर्वत, नदीच्या खोऱ्या आणि लहान गावांमधून जाते. येथे तुम्ही सांगला व्हॅली, बास्पा नदी, ब्रेलेंगी गोम्पा, सांगला मेडोज आणि बोरासू पास ट्रॅकला भेट देता येते. याशिवाय, तुम्ही बेरिंग नाग मंदिराला भेट देण्यासाठी जाऊ शकता.