Dark Circles: केमिकल क्रीम्स कशाला हव्यात? ‘या’ सोप्या घरगुती उपायाने डार्क सर्कल्सना करा छुमंतर!

Dark Circles: आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक समस्या समोर येतात, त्यामधील एक समस्या म्हणजे, डार्क सर्कल्स... पण काही घरगुती उपायांनी तुम्ही घरीत डार्क सर्कल्सना करा छुमंतर करु शकता... तर जाणून घ्या उपाय

Dark Circles: केमिकल क्रीम्स कशाला हव्यात? या सोप्या घरगुती उपायाने डार्क सर्कल्सना करा छुमंतर!
| Updated on: Nov 28, 2026 | 3:44 PM

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी चेहऱ्यावरील डोळ्यांचे सौंदर्य महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, अपुरी झोप, थकवा, ताणतणाव आणि इतर कारणांमुळे अनेकांच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. या डार्क सर्कल्समुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू शकतो. ही काळी वर्तुळे कमी करण्यासाठी अनेकजण महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. मात्र, घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या केळ्याच्या सालीचाही वापर काहीजण त्वचेच्या निगेसाठी करतात. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे घटक असतात. त्यामुळे त्वचेची निगा राखण्यासाठी तिचा वापर केला जातो. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी केळ्याची साल वापरण्याच्या तीन सोप्या पद्धती जाणून घेऊया.

थंड केळ्याच्या सालीचा वापर : सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर केळ्याची साल १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. थंड झालेली साल डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा. साधारण १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. मात्र, साल डोळ्यांच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या.

Loading...

केळ्याची साल आणि कोरफड जेल : केळ्याच्या सालीचे छोटे तुकडे करून घ्या. त्यामध्ये थोडे कोरफड जेल मिसळून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांखालील त्वचेवर हलक्या हाताने लावा. काही मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. कोरफड जेल त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करू शकते.

केळ्याची साल, मध आणि लिंबाचा रस : केळ्याच्या सालीची बारीक पेस्ट तयार करा. त्यामध्ये थोडे मध मिसळा. मात्र, डोळ्यांखालील नाजूक त्वचेवर लिंबाचा रस वापरणे टाळावे. कारण त्यामुळे जळजळ किंवा त्वचेची आग होऊ शकते.

पण काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. डोळ्यांखालील काळी वर्तुळे केवळ झोपेच्या कमतरतेमुळेच येतात असे नाही. आनुवंशिकता, अॅलर्जी, वय आणि त्वचेतील बदल यांसारखीही कारणे असू शकतात. केळ्याची साल लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात, याला ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणताही घरगुती उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. जळजळ किंवा खाज जाणवल्यास त्वरित वापर थांबवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us