AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaon News: सेफ्टी पिनने दात कोरत होती, तरुणीला चूक पडली महागात; जळगावमधील धक्कादायक घटना

दरम्यान, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत तरुणीचा जीव वाचवला. यावेळी टोकदार वस्तूंनी दात कोरण्याची सवय जीवघेणी ठरू शकते, असा सावधगिरीचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

Jalgaon News: सेफ्टी पिनने दात कोरत होती, तरुणीला चूक पडली महागात; जळगावमधील धक्कादायक घटना
Jalgaon News
| Updated on: Nov 28, 2026 | 3:35 PM
Share

किशोर पाटील, प्रतिनिधी: आपल्यापैकी अनेकांना जेवण झाल्यानंतर हातात मिळेल त्या छोट्या वस्तूने दात टोकरायची सवय असते. मात्र ही चूक अनेकदा चांगलीच महागात पडू शकते. जळगावमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.जळगावमध्ये सेफ्टी पिनने दात टोकरत असताना पीन तरुणीच्या पोटात गेल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन ती पिन काढली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावात दात कोरताना १८ वर्षीय तरुणीने सेफ्टी पीन गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणी दात टोकरत असताना तिच्याकडून चुकून पिन पोटात गेली. टोकदार सेफ्टी पीन अन्ननलिकेत अडकल्याने कुटुंबीय चांगलेच घाबरुन गेले. त्यांनी तात्काळ तरुणीला रुग्णालयात नेले. टोकदार सेफ्टी पीन अन्ननलिकेत अडकल्याने वैद्यकीय पथकासमोरही मोठे आव्हान होते.

सुदैवाने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांकडून तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरीने शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी अन्ननलिकेतून पीन काढली. तरुणीच्या अन्ननलिकेतून पीन निघाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.  दरम्यान, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत तरुणीचा जीव वाचवला. यावेळी टोकदार वस्तूंनी दात कोरण्याची सवय जीवघेणी ठरू शकते, असा सावधगिरीचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.

दात टोकरताना ही काळजी घ्या!

अणकुचीदार वस्तू टाळा: पिन, सुई, खिळे किंवा कडक टूथपिक यांसारख्या टोकदार वस्तूंनी दात कोरून काढू नका; यामुळे हिरड्यांना जखम होऊन संसर्ग होऊ शकतो किंवा दाताचे इनॅमल खरचटले जाऊ शकते. फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रश वापरा: दातांमधील अडकलेले कण काढण्यासाठी डेंटल फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रश वापरणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरते. हळुवार हालचाल करा: फ्लॉस किंवा ब्रश दातांमध्ये सरकवताना खूप जोरात किंवा झटक्यात ओढू नका; हिरड्यांच्या रेषेजवळ हळुवारपणे व काळजीपूर्वक स्वच्छता करा. प्रत्येक जागेसाठी नवा भाग वापरा: फ्लॉस वापरत असाल तर एका दातांच्या मधली जागा स्वच्छ केल्यानंतर धाग्याचा स्वच्छ भाग पुढच्या जागेसाठी वापरा, जेणेकरून घाण दुसऱ्या दातावर जाणार नाही.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
Eknath Shinde : डिलिमिटेशन विधेयकावरून एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले....
शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं
Sharad Pawar : शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयातून कॅन्सर रुग्णालयात हलवलं; नेमकं काय कारण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद...
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर राहुल गांधींची स्वतंत्र पत्रकार परिषद; डिलिमिटेशनवर भूमिका स्पष्ट करणार?
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक..
डिलिमिटेशन विधेयकावरून मविआत मतभेद उघड? आदित्य ठाकरेंनी घेतली आक्रमक भूमिका!
एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
Mallikarjun Kharge vs BJP : एकदा सत्ता भाजपकडे गेली की हे संविधानही बदलू शकतात
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गे यांचा थेट सवाल
मोदी सरकारचा सत्तेचा डाव? डिलिमिटेशन विधेयकावर खर्गेंनी उपस्थित केले गंभीर प्रश्न! बैठक संपताच...
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा.
मोदींचं डिलिमिटेशनबाबत सुचक ट्विट! महिलांना दिलेलं वचन पूर्ण केल्याचा केला उल्लेख, नेमकं काय म्हणाले पंतप्रधान?
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध...
वडिलांचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा, लेकीचा मात्र तीव्र विरोध; सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदेंमध्ये मतभेद!
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची...
राज ठाकरेंचा कल्याण-डोंबिवलीत दोन दिवसीय दौरा; 27 गावांसाठी मनसेची खास रणनीती!
तुतारीच्या हातात कमळ; अंबादास दानवेंनी पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं
Ambadas Danve vs Sharad Pawar : तुतारीच्या हातात कमळ; ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलं