AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sofa Cleaning Tips: कव्हर न काढता सोफ्याला नव्यासारखा लूक द्या, गृहिणींसाठी खास टिप्स

Sofa Cleaning Tips: अनेक सोफ्यांना कव्हर काढण्याच पर्याय नसतो. अशात सोफ साफ करण्यासाठी अनेकदा पैसे मोजावे लागतात. पण काही खास टीप्स जाणून तुम्ही घरच्या घरीच सोफा साफ करु शकता. महत्त्वाचं म्हणजे, गृहिणींसाठी या खास टिप्स आहेत.

Sofa Cleaning Tips: कव्हर न काढता सोफ्याला नव्यासारखा लूक द्या, गृहिणींसाठी खास टिप्स
| Updated on: Sep 18, 2026 | 4:35 PM
Share

Sofa Cleaning Tips: पूर्वी असे सोफे असायचे ज्यामुळे ते साफ करणं सहज सोपं व्हायचं. पण आता अनेक सोपे असतात जे स्वच्छ करताना अनेक अडचणी येतात. कारण त्यांचे कव्हर काढता येत नाही. विशेषतः ज्या घरांमध्ये लहान मुले असतात, तिथे तर सोफा साफ करणं अधिकच कठीण असतं. जर मुलांनी खाल्लेल्या अन्नाचे डाग आणि धूळ नियमितपणे स्वच्छ केली नाहीत, तर त्यातून जिवाणू आणि बुरशी पसरण्याची दाट शक्यता असते. पण तुम्ही घरातील स्वयंपाकघरातील काही वस्तू वापरून सोफ्यावरील घाण आणि डाग कमी वेळात काढून त्याला कव्हर न काढता अगदी नवीनसारखे बनवू शकता. त्यासाठी जाणून घ्या काही खास टिप्स…

तुम्ही व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता: सोफा धुण्यास सुरुवात करण्यापूर्वी, त्यावर साचलेली सर्व धूळ, केस आणि अन्नाचे कण पूर्णपणे काढून टाकणं आवश्यक आहे. सोफ्याच्या घड्या पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करा. जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर नसेल, तर धूळ काढण्यासाठी तुम्ही कोरडा, ओलसर ब्रश वापरू शकता.

बेकिंग सोडा आणि डिशवॉशिंग लिक्विड: एका ग्लासात कोमट पाणी, एक मोठा चमचा बेकिंग सोडा, एक छोटा चमचा डिशवॉशिंग लिक्विड आणि एक मोठा चमचा व्हिनेगर घ्या. हे सर्व व्यवस्थित मिसळा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. सोफ्याच्या घाणेरड्या भागांवर हे मिश्रण हलक्या हाताने फवारा. जास्त फवारू नका. त्यानंतर, मायक्रोफायबर कापड किंवा ब्रश वापरून हळुवारपणे घाण घासून काढा.

प्रेशर कुकरचे झाकण: एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात थोडे डिशवॉशिंग लिक्विड व डिशवॉशिंग डिटर्जंट घाला. या पाण्यात एक मायक्रोफायबर कापड बुडवा आणि ते चांगले पिळून घ्या. हे कापड प्रेशर कुकरच्या झाकणाभोवती गुंडाळा. कुकरचे झाकण धरून सोफ्याच्या पृष्ठभागावर दाबा. तुम्हाला दिसेल की सोफ्यावरील सर्व घाण या कापडाला चिकटली आहे.

दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा: जर तुमच्या सोफ्याला दमट किंवा कुबट वास येत असेल, तर सोफ्याच्या पृष्ठभागावर कोरडा बेकिंग सोडा शिंपडा. 20 – 30 मिनिटांनंतर, व्हॅक्यूम क्लिनरने किंवा ब्रशने तो बेकिंग सोडा पूर्णपणे काढून टाका. यामुळे दुर्गंधी पूर्णपणे शोषली जाईल.

व्हिनेगर: चहा, कॉफी किंवा शाईमुळे लागलेले डाग काढण्यासाठी, पाणी आणि व्हिनेगर समान प्रमाणात मिसळा, हे मिश्रण डाग असलेल्या भागावर चोळा, 5 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर ओल्या कापडाने पुसून टाका.

Follow Us
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं