स्वयंपाकघरात असलेल्या ‘या’ एका गोष्टीने बनवा चारकोल मास्क, लावताच चेहरा चमकेल

चमकदार आणि स्वच्छ त्वचा मिळविण्यासाठी महागडे सौंदर्य प्रोडक्ट वापरणे किंवा पार्लरमध्ये जाऊन स्किन केअर करणे प्रत्येकासाठी शक्य नाही. त्यामुळे घरगुती उपचार अजूनही खूप प्रभावी मानले जातात. आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरात असलेल्या फक्त एका गोष्टीने चारकोल मास्क बनवण्याचा एक अनोखा मार्ग सांगत आहोत. चला जाणून घेऊयात...

स्वयंपाकघरात असलेल्या या एका गोष्टीने बनवा चारकोल मास्क, लावताच चेहरा चमकेल
| Edited By: | Updated on: Jun 14, 2025 | 2:29 PM

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीचा, वाढत्या प्रदूषणाचा आणि चुकीच्या खाण्या-पिण्याचा परिणाम सर्वप्रथम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. चेहऱ्याचा रंग फिकट होतो, छिद्रे बंद होतात आणि त्वचा निर्जीव दिसू लागते. त्यामुळे काही लोकं पार्लरमध्ये जाऊन उपचार घेतात तर काहीजण चारकोल मास्क वापरतात. चारकोल मास्क चेहऱ्यावरील घाण साफ करतो आणि रंग सुधारतो आणि त्वचा चमकदार बनवते. जरी बाजारात अनेक ब्रँडचे चारकोल मास्क उपलब्ध आहेत. पण यामध्ये काहीप्रमाणत केमिकलचा वापर देखील असतो, ज्यामुळे चेहऱ्यावर यांचे काळांतराने दुष्परिणाम दिसू लागतात. पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्वयंपाकघरात असलेल्या हळदीने चारकोल मास्क घरी बनवू शकता.

हो, हळद चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच, हळदीमध्ये करक्यूमिन असते, जे एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. तसेच याच्या वापराने चेहऱ्यावर फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करते. याशिवाय त्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे चेहऱ्यावरील मुरुमे दूर करण्यास आणि त्वचा तरुण, चमकदार बनविण्यास मदत करतात. अशातच तुम्ही घरी हळदीपासून चारकोल मास्क कसा तयार करू शकता ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

हळदीपासून चारकोल मास्क कसा बनवायचा?

  • साहित्य: कच्ची हळद पावडर (2-3 तुकडे)
  • टोमॅटोचा रस
  • मध
  • कॉपी पावडर
  • लोखंडी तवा

बनवण्याची पद्धत: सर्वप्रथम कच्ची हळद चांगली धुवून सुकवा. आता ती लोखंडी तव्यावर किंवा मातीच्या तव्यावर मंद आचेवर ठेवा. हळद हळूहळू जळू लागेल आणि काळी होईल. हळद पूर्णपणे काळी झाल्यावर गॅस बंद करा. ती थंड करा आणि मिक्सरमध्ये या हळदीची बारीक पावडर करा. तुम्ही हळद पावडर देखील घेऊ शकता. यानंतर ती एका भांड्यात काढा आणि थंड झाल्यावर त्यात मध, टोमॅटोचा रस आणि कॉफी पावडर मिक्स करून पेस्ट बनवा.

चारकोल मास्क कसा लावायचा

सर्वप्रथम, तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर, तयार केलेला मास्क संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. 15-20 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही ते तुमच्या हातांवर, पायांवर आणि अगदी संपूर्ण शरीरावर लावू शकता. हळदीचा चारकोल मास्क त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेच्या आत साचलेली घाण साफ करते. अशातच जेव्हा तुम्ही चारकोल मास्क काढता तेव्हा काढल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

हळदीपासून बनवलेला चारकोल मास्क लावण्याचे फायदे

हळदीचा चारकोल मास्क त्वचेच्या छिद्रांमध्ये साचलेली घाण, तेल आणि मृत त्वचा काढून टाकतो. यामुळे चेहरा स्वच्छ, हलका आणि फ्रेश दिसतो. त्याच वेळी हा चारकोल मास्क त्वचेच्या उघड्या छिद्रांमध्ये साचलेली घाण बाहेर काढतो, ज्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स हळूहळू कमी होऊ लागतात. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया मारतात आणि जळजळ कमी करतात. यामुळे मुरुमांची समस्या नियंत्रणात राहते. तसेच त्वचेचा रंग सुधारण्यास आणि त्वचा घट्ट होण्यास मदत होते. जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर हा मास्क अतिरिक्त तेल शोषून त्वचेला संतुलित करतो, ज्यामुळे चेहरा बराच काळ फ्रेश राहतो. जेव्हा त्वचा पूर्णपणे स्वच्छ असते तेव्हा नैसर्गिक चमक देखील येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)