
घरी जेवण कितीही साधे बनवले तरी, जर त्यासोबत आंबट आणि मसालेदार लोणचे वाढले तर जेवणाची चव वाढते. बऱ्याचदा असे घडते की लोकांना भाज्यांशिवाय लोणच्यासोबत पोळी खायला आवडतो. आंबा असो, मिरची असो किंवा फणस असो, कोणत्याही गोष्टीचे लोणचे बहुतेक लोकांचे खुप आवडीचे असतात. तसेच लोणचं हा भारतीय पदार्थाचा एक महत्त्वाचा भाग आहे पण पावसाळ्यात वातावरण हे दमट असल्याने लोणच्यावर बुरशी वाढण्याची शक्यता वाढते. तर आता ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते जाणून घ्या.
जर लोणचे एकदा बनवले तर ते वर्षभरही खराब होत नाही, परंतु ते योग्यरित्या साठवणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेकदा लोणच्याला बुरशी लागते. याची अनेक कारणे असू शकतात. म्हणून, लोणचे साठवताना काही खबरदारी घ्यावी, ज्यामुळे लोणचे खराब होणार नाही. पावसाळ्याच्या दिवसातही लोणचे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे या लेखात जाणून घेऊया.
लोणच्याचे साहित्य कोरडे असावे
जेव्हा तुम्ही लोणचे बनवता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही आंबा, फणस, लिंबू यांसारखे गोष्टी सुक्या असाव्यात. तुम्ही जेव्हा यापासुन लोणच बनवता तेव्हा या गोष्टी इतके वाळवा की त्यांच्यातील ओलावा कमी होईल. त्यात तुम्ही कोणतेही मसाले टाकले तरी ते ओले नसावेत. जर असे झाले तर पावसात ओलावा असल्याने लोणचे खराब होण्याची शक्यता वाढते.
जास्त तेल आणि मीठ घाला
जेव्हाही तुम्ही लोणचे बनवाल तेव्हा त्यात भरपूर तेल आणि मीठ टाका, कारण बऱ्याचदा असे होते की मीठ आणि तेलाच्या कमतरतेमुळे लोणच्याला बुरशी लागते आणि खराब होते. तेव तेल आणि मीठ जास्त असे तर पावसाळ्यात लोणच्याला बुरशी लागत नाही.
अशा पद्धतीने लोणचे साठवा
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोणचे बनवल्यानंतर ते कसे साठवावे. ते कधीही ओल्या डब्यात ठेवू नका. याशिवाय प्लास्टिकच्या डब्याऐवजी ते सिरेमिक जार किंवा काचेच्या डब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पावसाळ्यातही लोणचे खराब होणार नाही.
लोणचे काढण्यासाठी कोरड्या चमच्याचा वापर करा
जेव्हा तुम्ही एखाद्याला जेवणासोबत लोणचे वाढता तेव्हा लक्षात ठेवा की ज्या चमच्याने तुम्ही लोणचे काढता तो कोरडा असावा, कारण ओल्या चमच्याने लोणच्यामध्ये ओलावा येतो ज्यामुळे ते खराब होऊ शकते.
या गोष्टी लोणच्यामध्ये टाकल्यास बुरशी रोखता येईल
लोणच्याला बुरशीपासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यात एक चमचा सायट्रिक आम्ल टाकू शकता किंवा एक चमचा व्हिनेगर वापरू शकता. यामुळे लोणच्यामध्ये बुरशी वाढण्यापासून रोखले जाते. सुरुवातीला लोणचे बनवताना, डब्यावर झाकण ठेवू नका त्याऐवजी ते सुती कापडाने झाकून ठेवा आणि काही दिवस सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)