
मुंबई: कडक उन्हाचा कहर सुरूच आहे. केवळ उत्तर भारतच नव्हे, तर संपूर्ण देशातील बहुतांश राज्यांमध्ये उन्हाळ्याचा कडाका जाणवत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये तापमानाने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. याचे उदाहरण म्हणजे रविवारी दिल्लीतील नजफगढमधील तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. या उष्णतेमुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दिलासा मिळण्यासाठी कोणताही सोपा उपाय नाही.
घर थंड ठेवण्यासाठी लोक विविध युक्त्या अवलंबत आहेत. ते दिवसभर एसी आणि कूलर चालवत आहेत किंवा दिवसातून २-३ वेळा आंघोळ करून स्वत:ला थंड ठेवत आहेत. आज आम्ही तुम्हाला 2 घरगुती मार्ग सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने घर थंड ठेवता येते. चला तर मग जाणून घेऊया.
घरात प्यायचं पाणी माठात ठेवा. याने पाणी अतिशय थंड राहतं, हे पाणी आरोग्यासाठी देखील उत्तम. यामुळे खोलीचे तापमान कमी होऊन वातावरण थंड व आल्हाददायक राहील.
दिवसाच्या अशा वेळी जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवल्याने उष्णतेचा प्रभाव कमी होतो आणि घर थंड राहते.
छत झाकण्यासाठी कापड वापरा. कापडामुळे छतावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही आणि आतील वातावरण शांत व थंड राहील.
घरात वनस्पती ठेवणे आणि सर्वात जास्त उन्हाच्या ठिकाणी ठेवणे आपले घर थंड ठेवण्यास मदत करते.