Lip Care | बेसनने दूर करा ओठांचा काळेपणा, गुलाबी ओठ कसे मिळवावेत?

बेसन आपल्या ओठांवरील टॅनिंग सहज काढून टाकते. सहसा अनेकांचे वरचे ओठ खूप काळे दिसतात. अशावेळी हा लिप लाइटनिंग मास्क तुमच्या वरच्या ओठांचा काळापणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो, तर चला जाणून घेऊया बेसन लिप लाइटनिंग मास्क कसा बनवावा.

Lip Care | बेसनने दूर करा ओठांचा काळेपणा, गुलाबी ओठ कसे मिळवावेत?
Lip care
| Updated on: May 23, 2023 | 4:30 PM

मुंबई: बेसनमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास उपयुक्त आहेत. त्यामुळे प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसनाचा समावेश करण्यात आला आहे. बेसन आपल्या त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास उपयुक्त आहे. तर आज आम्ही तुमच्यासाठी बेसन लिप लाइटिंग मास्क घेऊन आलो आहोत. बेसन आपल्या ओठांवरील टॅनिंग सहज काढून टाकते. सहसा अनेकांचे वरचे ओठ खूप काळे दिसतात. अशावेळी हा लिप लाइटनिंग मास्क तुमच्या वरच्या ओठांचा काळापणा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो, तर चला जाणून घेऊया बेसन लिप लाइटनिंग मास्क कसा बनवावा.

बेसन लिप लाइटनिंग मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • बेसन दोन चमचे
  • दूध गरजेनुसार
  • हळद एक चिमूटभर

बेसन लिप लाइटनिंग मास्क कसा बनवावा?

  • बेसन लिप लाइटनिंग मास्क बनविण्यासाठी, प्रथम एक वाटी घ्या.
  • नंतर बेसन, दूध आणि हळद घालून चांगले मिक्स करा.
  • यानंतर ते नीट मिक्स करून जाड पेस्ट तयार करा.
  • आता तुमचा बेसन लिप लाइटनिंग मास्क तयार आहे.
  • त्यानंतर तयार केलेले लिप बाम ओठांवर चांगले लावा.
  • यानंतर ते वाळायला सोडा.
  • त्यानंतर पाण्याच्या साहाय्याने ओठ धुवून स्वच्छ करावेत.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)