
अनैतिक संबंधमुळे पती आणि पत्नीच्या नात्यात दुरावा येत असतो.पती आणि पत्नीच्या नात्यातील ही बेवफाई नेहमीच नात्यात कटुता आणत असते. अलिकडे एका दाम्पत्याच्या नात्यात अशीच कटूता आली. त्याचे झाले काय पती एका महिलेसोबत हॉटेलात रात्र घालवून आला आणि पत्नीला म्हणाला की कंपनीचे बजेट कमी होते त्यामुळे मला रुम शेअर करावा लागला !
मलेशियातील ही महिला जिला “Ms. Y” या नावाने ओळखले जात आहे. तिने अलिकडे २२ ऑगस्ट २०२५ रोजी डीजे चान फोंग यांच्या फेसबुक पेजवर आपला वैयक्तिक संघर्ष शेअर केला आहे. तिने आपला १३ वर्षांचे वैवाहिक आणि १८ वर्षांचे नात्यातील कटू अनुभव व्यथीत केले आहेत. तिला आपला पती कसा आदर्श वाटत होता, परंतू खाजगी जीवनात भावनात्मक अंतर आणि थंडपणाला तिला कसे सामोरे जावे लागले हे तिने सांगितले.
या दाम्पत्याला एक मुलही आहे. Ms. Y ने सांगितले की एप्रिल २०२५ मध्ये तिचा संशय तेव्हा दाट झाला जेव्हा ती तिचा मोबाईल फोन शोधत होती. तेव्हा तिने तिच्या पतीच्या फोनचा वापर केला. तेव्हा तिला रात्री दोन वाजता एका महिला सहकार्याचा मॅसेज दिसला. – ‘गुड नाईट’ या मॅसेजसह एक स्टीकर होते. जेव्हा तिने चाट हिस्ट्री उघडण्याचा प्रयत्न केला तर जुने मॅसेज डिलीट केल्याचे आढळले. त्यामुळे तिचा संशय वाढला आणि संपूर्ण रात्र ती झोपू शकली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी सार्वजनिक सुट्टी होती. तिचे पती ऑफीसला जाण्याच्या बहाणा करुन घरातून बाहेर गेले. त्यामुळे Ms.Y स्वत: त्यांच्या कार्यालयात पोहचली तेव्हा ते दिसले नाहीत. त्यानंतर Ms.Y यांनी पतीला त्या मॅसेजबद्दल सवाल केला तेव्हा तिच्या पतीने स्वीकार केले आणि सांगितले की सहकारी महिलेने तिच्या भावना व्यक्त केल्या. आणि पत्नीला सांगितले की तुला वाईट वाटू नये म्हणून मॅसेज डिलीट केले.
Ms. Y यांनी पतीला आधीच महिला सहकाऱ्यांशी जास्त संपर्क न करण्याची आणि अंतर राखण्याची विनंती केली होती. तरी तिचे पती महिला सहकाऱ्यांशी बोलत होते. कधी त्या खाजगी मॅसेज पाठवायच्या तर कधी कंपनी ग्रुपमध्ये तिच्या पतीला ‘चांगला’ आणि ‘हॅण्डसम’ असे संबोधित करायची.पतीने दावा केला होता की त्याने सर्व स्पष्ट केले आहे. परंतू व्यवहारात खूपच कमी बदल पाहायला मिळाला.