रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहात करा या गोष्टींचा समावेश, अन् पावसाळ्यातील आजार टाळा

मान्सूनच्या आगमनामुळे उष्णतेपासून आराम मिळाला आहे पण हंगामी आजारांचा धोका मात्र वाढत असतो. या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेले लोकं सहज आजारी पडू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहात करा या गोष्टींचा समावेश, अन् पावसाळ्यातील आजार टाळा
| Edited By: | Updated on: Jun 22, 2025 | 1:56 AM

पावसाळा ऋतू सुरू झाला आहे. पावसाळ्यात अनेक हंगामी आजारांचा धोका वाढतो. अशातच ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांना पावसाळी हंगाामी आजार होतात. या दिवसांमध्ये हंगामी फ्लूचे रुग्णही लक्षणीयरीत्या वाढतात. जर तुम्हाला स्वतःला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सुरक्षित राहायचे असेल तर तुमच्या आहारात अशा पदार्थाांचा समावेश करणे महत्वाचे आहे जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. आजच्या या लेखात या ऋतूत कोणते आजार जास्त होतात. तसेच यासोबतच आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी सर्वोत्तम आहेत. चला तर मग विलंब न करता सविस्तरपणे जाणून घेऊया –

या आजारांचा धोका वाढतो

टायफॉइड

मलेरिया

डेंग्यू

चिकनगुनिया

इन्फ्लूएंझा

विषाणूजन्य संसर्ग

न्यूमोनिया

या गोष्टींचे सेवन करा

तुळस

तुळस ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. पावसाळ्यात डासांमुळे होणारे अनेक आजार पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुळशीचे सेवन करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा काढा बनवून पिऊ शकता किंवा त्याची पाने थेट चावू शकता. यामुळे केवळ आजार दूर राहतातच असे नाही तर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते.

आले

आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स सर्दी आणि खोकल्यापासून आराम देण्यास मदत करतात. तुम्ही आल्याची चहा किंवा काढा पिऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते भाज्यांमध्ये मसाल्याच्या स्वरूपात देखील वापरू शकता. बरेच लोकं ते थेट खायला देखील पसंत करतात. एकंदरीत आले रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी काम करते.

गरम पेये प्या

या ऋतूत स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही सूप, हर्बल टी आणि डेकोक्शनचे सेवन करू शकता . यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. यासोबतच घशातील खवखव देखील बरी होईल.

काळी मिरी

काळी मिरीमध्ये उष्णतेचा प्रभाव असतो. त्यात असलेले पाइपरिन नावाचे तत्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही त्याचे सेवन केले तर ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.

ताजी फळे आणि भाज्या

पावसाळ्यात आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा . हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)