Indoor Workout Tips | बाहेर कोरोनाचा धोका? घरच्या घरी ‘या’ व्यायाम प्रकारांनी ठेवा स्वतःला फिट!

| Updated on: Dec 21, 2020 | 4:52 PM

कोरोना विषाणूच्या भीतीने आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यावर काहीना काही परिणाम झाला आहे.

Indoor Workout Tips | बाहेर कोरोनाचा धोका? घरच्या घरी ‘या’ व्यायाम प्रकारांनी ठेवा स्वतःला फिट!
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या भीतीने आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यावर काहीना काही परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वच कमीत कमी वेळा घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. कोरोनाच्या धास्तीने अनेकांनी मॉर्निंग वॉक करणे देखील सोडले आहे. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. जीम उघडल्यानंतरही बरेच लोक बाहेर जाणे टाळत आहेत. जर, आपण देखील कोरोना विषाणूच्या भीतीमुळे व्यायाम, कसरत करणे सोडत असाल तर, अशी चूक अजिबात करू नका. ‘हे’ काही घरगुती व्यायामप्रकार तुम्हाला घरच्या घरी तंदुरुस्त राहण्यास फायदेशीर ठरतील (Indoor Workout Tips during Corona pandemic).

नृत्य

प्रदूषण आणि कोरोनामुळे घराबाहेर पडणे धोक्यापेक्षा काही कमी नाही. म्हणून घरीच आपण योगा आणि झुम्बासारख्या इनडोअर वर्कआऊट्सचा प्रयत्न करू शकता. झुम्बा व्यतिरिक्त आपण कोणतेही नृत्य करू शकता. यामुळे आपल्याला ताजेतवाने आणि उत्साहित वाटेल.

योगा आणि सूर्यनमस्कार

आपल्याला योगा येत नसेल तर, आपण सूर्य नमस्कारासारख्या मूलभूत योग आसनसह प्रारंभ करू शकता. सूर्यनमस्कार शरीराच्या स्नायूंना ताणतो आणि आपल्याला दिवसभर ऊर्जा देतो. आपण इंटरनेटवर ही योगासने पाहू शकता.

प्राणायाम

योगा आणि झुम्बाप्रमाणे प्राणायाम करणे देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी दीर्घ श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे तुमची श्वसन प्रणाली चांगली राहते.

अ‍ॅक्रोयोगा

आपण घरातच अ‍ॅक्रोयोगा करण्याचा प्रयत्न करू शकता. या अ‍ॅक्रोबॅटिक्स आणि योगाचा मिश्रित प्रकार आहे. स्नायूंच्या सामर्थ्यासाठी आपण आपल्या शरीराचे वजन, पुस्तके इत्यादी गोष्टी वापरू शकता.

वॉल पुशअप्स

वॉल पुशअप्स, स्क्वॅट्स, क्रंच्स इत्यादी काही व्यायाम आहेत जे घरच्या घरी अगदी 15-20 मिनिटांत होतात (Indoor Workout Tips during Corona pandemic).

आहाराची काळजी घ्या.

कोरोना साथीच्या काळात आणि तीव्र थंडीमध्ये स्वत:ला निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, तणाव आणि व्यस्त जीवनशैलीमुळे स्वत:ला निरोगी ठेवणे हे एखाद्या आव्हानापेक्षा काही कमी नाही. परंतु, अशावेळी आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी सोप्या सरळ गोष्टी दुर्लक्षित करून अनेकदा फॅन्सी डाएट आणि हार्डकोर व्यायामावर लक्ष केंद्रित करतो.

कमी खाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे व अत्याधिक खाणे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. शरीराला कोणत्याही प्रकारचा अपाय न होता वजन कमी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये भरपूर खा, तयार बनविलेले पदार्थ खा, कितीही खा, अशा पध्दतीने आहार घेतला जातो, गरजेपेक्षा जास्त आहार शरीरात ढकलला जातो. आपल्याकडे अन्न पदार्थाचे स्वरूप, त्यातील पौष्टिक घटक न बघता फक्त पॅकिंग किंवा कंपनीचे नाव बघून अन्नपदार्थ खाल्ले जातात. या सर्व प्रकारामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे.

(Indoor Workout Tips during Corona pandemic)

हेही वाचा :