
बॉलिवूड अभिनेत्री त्यांचे सौंदर्य टीकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांची त्वचा कायम चांगली राहावी यासाठी ते बरीच काळजी घेत असतात. मग ते कॉस्मटीक असो किंवा नैसर्गिक पद्धतीने असो. पण बऱ्याचशा अभिनेत्री घरगुती उपायही बरेचसे करताना दिसतात ज्यामुळे त्यांची स्कीन आणि आरोग्य दोन्ही चांगले राहते. अशीच एक अभिनेत्री आहे ती देखील एक घरगुती उपाय करते ज्यामुळे तिच्या शरीराचा सुंगध येतो असं तिने सांगितलं. ती म्हणजे जॅकलिन फर्नांडिस.
जॅकलिन फर्नांडिस पिते हे फ्लेवर्ड मिल्क
जॅकलिन फर्नांडिस तिच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त तिच्या सौंदर्य, फिटनेस आणि चमकदार त्वचेसाठी ओळखली जाते. ती तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या चाहत्यांसह वारंवार फिटनेस टिप्स शेअर करते. तथापि, यावेळी तिने फिटनेसच्या बाहेर एक खास रेसिपी शेअर केली. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान, जॅकलिन फर्नांडिसने तिच्या फ्लेवर्ड मिल्कची रेसिपी शेअर केली, जे ती दररोज पिते. अभिनेत्री म्हणते की हे खास दूध प्यायल्याने नैसर्गिकरित्या शरीराचा एक आनंददायी सुंगध येतो. जॅकलिनचा दावा आहे की दररोज हे दूध प्यायल्याने केवळ आरोग्यच सुधारते असे नाही तर नैसर्गिकरित्या शरीराची दुर्गंधी देखील दूर होते. तर, जॅकलिन फर्नांडिस पित असलेलं हे खास दूध कसं बनवलं जातं, जाणून घेऊयात.
दूध बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय आहेत?
जॅकलिन स्पष्ट करते की हे दूध चवीलाही तेवढेच चांगले लागते. हे दूध बनवण्यासाठी लागणारे साहित्य काय आहेत?
हिरवी वेलची
दालचिनीचा छोटा तुकडा
स्टार अॅनीस
लवंगा
गुलाबाच्या पाकळ्या आणि
थोडेसे मॅपल सिरप (पर्यायी)
दूध कसे बनवायचे?
सर्वप्रथम एका पॅनमध्ये 1 ग्लास दूध घ्या.
2 हिरव्या वेलची, दालचिनीचा एक छोटा तुकडा, 1 चमचा बडीशेप, 3 ते 4 लवंगा आणि काही गुलाबाच्या पाकळ्या घाला.
मंद आचेवर हे दूध चांगले उकळवा जेणेकरून मसाल्यांचा संपूर्ण स्वाद दुधात मिसळेल.
उकळल्यानंतर, दूध गाळून घ्या आणि हवे असल्यास, गोड चवीसाठी थोडे मॅपल सिरप घाला.
त्यानंतर हे खास दूध तयार होईल, तुम्ही ते गरम किंवा कोमट पिऊ शकता.
शरीराचा दुर्गंधी का येते आणि हे दूध कसे ते रोखण्यासाठी कशी मदत करते?
जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा बॅक्टेरिया सक्रिय होतात, ज्यामुळे शरीराची दुर्गंधी येते. जॅकलिनच्या मते, या मसाला दुधात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असलेले घटक असतात. हे शरीरात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात आणि हळूहळू नैसर्गिक शरीराचा गंध सुधारतात. हे दूध दररोज प्यायल्याने शरीराला आतून पोषण मिळते, त्वचा आणि आरोग्य दोन्ही सुधारते. म्हणून, तुम्ही देखील तुमच्या आहारात हे खास दूध समाविष्ट करू शकता.