दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्यासाठी जॅकलिनचं प्रेम; उचललं मोठं पाऊल, चाहत्यांकडून होतंय कौतुक
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्याबद्दल तिचं कौतुकही केलं जात आहे. तिने एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या एका चिमुकल्याच्या शस्त्रक्रियेचा सर्व खर्च उचलला आहे. एवढंच नाही तर तिने त्या लहानग्याची जाऊन भेटही घेतली.

कोणत्याना कोणत्या कारणाने ट्रोल होणारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे तिने दाखवलेली उदारता आणि घेतलेला एक निर्णय.
जॅकलिनने घेतली दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याला भेटली
जॅकलिनने एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्याला भेटली. तिने त्याच्यासोबत बराच वेळ घालवला. त्याच्याशी गप्पा मारल्या. जॅकलिनला मुलाची ही अवस्था पाहू शकली नाही आणि तिने त्याच्या शस्त्रक्रियेचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलासोबत जॅकलिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते तिच्या उदारतेचे कौतुक करत आहेत.
चिमुकल्याला प्रेमाने मिठी मारताना आणि त्याच्यावर प्रेम करताना दिसत आहे.
सामाजिक कार्यकर्ता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हुसेन मन्सुरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलाला भेटून त्याच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. ती मुलाला प्रेमाने मिठी मारताना आणि त्याच्यावर प्रेम करताना दिसत आहे. यादरम्यान, ती मुलाच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलताना देखील दिसत आहे.
चाहत्यांकडून जॅकलीनचे कौतुक
हा व्हिडिओ शेअर करताना हुसेन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘जॅकलिन फर्नांडिस, त्याच्या शस्त्रक्रियेची काळजी घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप दयाळू आहात, चांगल्यासाठी आशा आहे. या मुलासाठी प्रार्थना करा.’
हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करताना जॅकलीनने लिहिले, ‘धन्यवाद हुसेन भाई. चला आपण सर्वजण मोहम्मद आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया.’ चाहत्यांनाही हा व्हिडीओ खूप भावला असून त्यांनी त्या चिमुकल्यासाठी प्रार्थना केली आहे तसेच जॅकलीनचे कौतुकही केले आहे.
View this post on Instagram
मुलाला कोणता आजार आहे?
व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा हायड्रोसेफलस नावाच्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. यामध्ये मेंदू पाण्याने भरला जातो, ज्यामुळे डोके मोठे झाले आहे.
जॅकलिन फर्नांडिसच्या कामाबद्दल
जॅकलिन फर्नांडिस शेवटची अक्षय कुमारच्या मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल 5’ मध्ये दिसली होती. त्याचबरोबर आता ती लवकरच अक्षय कुमार, सुनील शेट्टी, संजय दत्त, रवीना टंडन, दिशा पटानी आणि इतर कलाकारांसह ‘वेलकम टू द जंगल’ मध्ये दिसणार आहे.
