.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Brown Sugar Vs White Sugar : ब्राऊन शुगर की व्हाईट शुगर? आपल्यासाठी कोणती चांगली, वाचा…

मुख्यतः पांढरी साखर गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. साखरेचे दोन प्रकार आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. एक म्हणजे आपण नेहमी वापरतो ती पांढरी साखर आणि दुसरी म्हणजे ब्राउन शुगर, ब्राउन शुगरमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.

Brown Sugar Vs White Sugar : ब्राऊन शुगर की व्हाईट शुगर? आपल्यासाठी कोणती चांगली, वाचा...
बऱ्याच वेळा आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. मग अशावेळी आपण साखरऐवजी गूळ, स्टीव्हिया किंवा पाम कँडी सारखे निरोगी पर्याय खाल्ले पाहिजेत. या गोष्टी शरीरासाठी फायदेशीर असतात.
| Edited By: | Updated on: Jun 25, 2021 | 12:15 PM
Share

मुंबई : मुख्यतः पांढरी साखर गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. साखरेचे दोन प्रकार आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. एक म्हणजे आपण नेहमी वापरतो ती पांढरी साखर आणि दुसरी म्हणजे ब्राउन शुगर, ब्राउन शुगरमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सारख्या गुणधर्म आहेत. पांढर्‍या रंगाच्या साखरेपेक्षा ब्राउन शुगरवर रासायनिक प्रक्रिया कमी केलेल्या असतात. (Brown sugar is extremely beneficial for health)

वजन कमी करण्यासाठी – पांढर्‍या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. ब्राउन शुगर चयापचय दर वेगाने वाढवते. हे भूक कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी – ब्राउन शुगरमध्ये व्हिटॅमिन बी असते. हे वृद्धत्वाची समस्या दूर करण्यात मदत करते. त्यात खनिज घटक आढळतात. हे त्वचेच्या पेशींसाठी फायदेशीर आहे. त्वचा ब्राइट करण्यासाठी आपण ब्राउन शुगरचा उपयोग स्क्रबर म्हणून करू शकतो.

दम्याच्या उपचारासाठी – दम्याचे रुग्ण पांढर्‍या साखरेऐवजी ब्राउन शुगर वापरू शकतात. त्यामध्ये असणारे अॅन्टी-अॅलर्जी गुणधर्म दम्यावर मात करण्यास मदत करू शकतात.

पीरियड्सच्या त्रास कमी करण्यासाठी – ब्राउन शुगरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. पोटॅशियम स्नायूंना आराम देण्याचे कार्य करत असते. पीरियड्समध्ये ब्राउन शुगरचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.

पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी – ब्राउन शुगर पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे पोटा संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात मदत करते. पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी, आपण एक ग्लास कोमट पाण्यात ब्राउन शुगर मिक्स करून प्यावी.

अँटीसेप्टिक – ब्राउन शुगरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. तसेच त्यात एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत. हे संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करते. म्हणून आपण ते अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Brown sugar is extremely beneficial for health)

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर