AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधुमेह होण्यापूर्वीच ‘हे’ आयुर्वेदिक उपाय करा अन् मधुमेहापासून दूर राहा!

मधुमेह हा चयापचय सिंड्रोमचा एक भाग आहे. ज्यामध्ये शरीरात साखरेची पातळी वाढू लागते. मधुमेह आणि प्री-मधुमेहची प्रकरणे भारतात दिवसेंदिवस वाढत आहेत.

मधुमेह होण्यापूर्वीच 'हे' आयुर्वेदिक उपाय करा अन् मधुमेहापासून दूर राहा!
मधुमेह
| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 11:44 AM
Share

मुंबई : मधुमेह हा चयापचय सिंड्रोमचा एक भाग आहे. ज्यामध्ये शरीरात साखरेची पातळी वाढू लागते. मधुमेह आणि प्री-मधुमेहची प्रकरणे भारतात दिवसेंदिवस वाढत आहेत. मधुमेहाचे मुख्य कारण खराब जीवनशैली आहे. प्री-मधुमेह हा लठ्ठपणाशी संबंधित आहे, विशेषत: ओटीपोटात किंवा व्हिस्टरल लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. (Follow these tips for pre diabetes patients)

प्री मधुमेहाच्या रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग वाढतात. मधुमेहापूर्वीची लक्षणे आणि ते कमी करण्याच्या पद्धतींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. प्री मधुमेहाची कोणतीही स्पष्ट लक्षणे नाहीत. परंतु साखरेचे प्रमाण वाढवणे अनेक रोगांशी संबंधित आहे. यामध्ये, तुम्हाला जास्त तहान लागेल आणि रात्रीच्या वेळी जास्त वेळा लघवी करावी लागते आणि जखम बरी होण्यास सामान्यपेक्षा जास्त वेळ लागतो.

हळद आणि आवळा

आवळा पावडर आणि हळद एकत्र करून पेस्ट बनवा. या मिश्रणाचे सेवन केल्यास मधुमेहावरील रामबाण उपाय आहे. यामुळे शरीरातील ग्लूकोज नियंत्रणात राहते. हे मिश्रण वापरल्याने मोतीबिंदू आणि रोगप्रतिकारक यंत्रणा व इतर आजारांशी संबंधित अडचणींही प्रतिबंध होतात.

मेथीचे दाणे

मधुमेहाच्या रूग्णांसाठी मेथीची दाणे अत्यंत फायदेशीर आहेत. साखर नियंत्रित करण्यास मेथीचे दाणे फायदेशीर आहेत. यामुळे इन्सुलिनचा प्रतिकारही कमी होतो. मेथीचे दाणे वजन कमी करण्यासही मदत करतात.

आपल्या आहारावर विशेष लक्ष द्या

आहारात जंक फूड, तळलेले पदार्थ, साखर, सॉफ्ट ड्रिंक्स, दूध आणि आंबलेल्या गोष्टी खाणे टाळा. आहारात फळे आणि भाज्या अधिक खा, ज्यामध्ये ग्लायसेमिक निर्देशांक कमी आहे. डाळी आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खा. प्रक्रिया केलेले अन्न आणि लाल मांस खाणे टाळा.

एक्सरसाइज

निरोगी राहण्यासाठी योग आणि व्यायाम करा. शारीरिक व्यायाम केल्याने कॅलरी जळण्यास मदत होते. याशिवाय वाढीव साखर देखील नियंत्रित केली जाऊ शकते.

या गोष्टी लक्षात ठेवा 

मधुमेह रूग्णांनी रात्री 8 ते 9 दरम्यान रात्रीचे जेवण केले पाहिजे. कारण त्यांची पाचक प्रणाली सामान्य लोकांपेक्षा कमकुवत होते, ज्यामुळे जेवण उशीराने पचन होते. विलंब झालेल्या रात्रीच्या जेवणामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. जर आपल्याला रात्री भूक लागली असेल, तर आपण कुरमुरे, भाजलेले हरभरे इत्यादी खाऊ शकता.

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these tips for pre diabetes patients)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...