AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अंड्याचा फेस मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा!

आपल्या सर्वांना माहित आहे की, अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला हे माहीती आहे का? की, अंडी आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहेत.

Skin Care : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी अंड्याचा फेस मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 2:10 PM
Share

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की, अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण तुम्हाला हे माहीती आहे का? की, अंडी आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहेत. अंडी चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आपण अंड्यापासून तयार होणारे विविध फेस मास्क घरच्या-घरी तयार करून शकतो. या फेस मास्कमुळे आपला चेहरा ग्लोईंग होतो. (Egg face mask is beneficial for the skin)

-अंडी प्रथिने आणि व्हिटॅमिन ए समृद्ध असतात. ज्यामुळे त्वचेवरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि मुरुम काढून टाकण्यास मदत होते. व्हिटॅमिन ए वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करते. जर आपल्याला चमकणारी त्वचा हवी असेल तर आपण अंडी फेसमास्क वापरू शकता.

-आपल्याला एका वाडग्यात एक अंडे घ्यावे लागेल. त्यामध्ये साखर, एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिक्स करून घ्या. त्याचे चांगले मिश्रण तयार करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि नंतर ते पाण्याने धुवा. हा मास्क आपण आठ दिवसातून तीन वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे. यामुळे आपली त्वचा चांगली होते. या व्यतिरिक्त वृद्धत्वाची समस्या दूर करण्यात मदत होते.

-अंड्यातील पिवळ बलक आणि टी ट्री ऑईल चांगले मिक्स करून घ्या. हे मिश्रण हाताने चेहऱ्याला लावा. हा मास्क सुमारे 20 ते 30 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. ओल्या कपड्याने चेहऱ्यावर हळूवारपणे मालिश करा आणि ते स्वच्छ करा. यानंतर पाण्याने धुवा. मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हा मास्क फायदेशीर आहे. हा मास्क आपण आठ दिवसातून तीन वेळा लावला पाहिजे.

-एका वाटीमध्ये अंडे घ्या आणि त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा नारळाचे तेल मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर ते पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा केला पाहिजे. यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. हा फेस मास्क चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Egg face mask is beneficial for the skin)

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर