AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Recipe tips: वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे? मग आपल्या आहारामध्ये आजच मूगडाळीच्या चिला घ्या, वाचा फायदे! 

मुगाची डाळ खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहे. मुगाच्या डाळीला आरोग्याचा खजिना आहे, असे म्हणतात. याचे सेवन केल्याने शरीरात ते सर्व पोषक तत्व पूर्ण होतात, जे निरोगी (Healthy) राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मूग डाळीमध्ये ए, बी, सी आणि ई सारखी अनेक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.

Recipe tips: वाढलेले वजन झटपट कमी करायचे आहे? मग आपल्या आहारामध्ये आजच मूगडाळीच्या चिला घ्या, वाचा फायदे! 
मुगडाळी चिला खाल्ल्याने वजन कमी होण्यास होते मदत.Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 2:57 PM
Share

मुंबई : मुगाची डाळ खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) आहे. मुगाच्या डाळीला आरोग्याचा खजिना आहे, असे म्हणतात. याचे सेवन केल्याने शरीरात ते सर्व पोषक तत्व पूर्ण होतात, जे निरोगी (Healthy) राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मूग डाळीमध्ये ए, बी, सी आणि ई सारखी अनेक जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर पोटॅशियम (Potassium), लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॉपर, फोलेट, फायबर यांसारखे इतर पोषक घटकही त्यात मुबलक प्रमाणात असतात.

विशेष म्हणजे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्याच्यासाठी मुगाची डाळ अत्यंत फायदेशीर आहे. मुगाच्या डाळीने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये मुग डाळीच्या चिल्याचा समावेश करायला हवा. आज आम्ही तुम्हाला मूग डाळ चीला कसा बनवायचा ते सांगणार आहोत. विशेष म्हणजे निरोगी असण्याबरोबरच हा चिला अत्यंत चवदार देखील असतो. चला तर मग पाहूयात हेल्दी मूग डाळ चील्याची रेसिपी.

साहित्य- मूग डाळ एक वाटी, मीठ एक टीस्पून, चाट मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, तिखट, धने पावडर.

कृती

हा खास चिला करण्यासाठी मूग डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. भिजवलेल्या डाळीची मिश्रण करून पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये मीठ, लाल तिखट आणि धनेपूड घाला. त्यात चिरलेली कोथिंबीर आणि चाट मसाला घाला. आता एक नॉन-स्टिक पॅन घ्या आणि त्यावर थोडे तेल लावा. तयार केलेल्या पिठातले साहित्य घेऊन तव्यावर पसरवा. तयार केलेले पिठ तव्यावर पसरवा. थोडा वेळ बेक केल्यानंतर, ते उलटा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्यात पनीर देखील घालू शकता जेणेकरून ते अधिक चवदार होईल. काही वेळाने तुमचा मूग डाळ चीला तयार आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Tips : फटाफट वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे खास 4 पेय प्या!

Summer skin care: गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये या गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक, त्वचा तजेलदार होईल!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली