Drinks : वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात ‘या’ निरोगी पेयांचा समावेश करा!

| Updated on: Aug 31, 2021 | 7:53 AM

उष्णतेवर मात करण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोल्ड डिशचा जास्त वापर केला जातो. स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा स्थितीत तुम्ही अनेक प्रकारचे पेय घेऊ शकता. हे खास पेय फक्त वजन कमी करण्यासाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत.

Drinks : वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात या निरोगी पेयांचा समावेश करा!
वजन कमी करण्यासाठी खास पेय
Follow us on

मुंबई : उष्णतेवर मात करण्यासाठी आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोल्ड डिशचा जास्त वापर केला जातो. स्वतःला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे आहे. अशा स्थितीत तुम्ही अनेक प्रकारचे पेय घेऊ शकता. हे खास पेय फक्त वजन कमी करण्यासाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊयात वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणते पेय घेऊ शकता. (Include these healthy drinks in your diet to lose weight)

सफरचंद आइस्ड टी – सफरचंद आइस्ड टी तुम्हाला हायड्रेटेड ठेवते आणि वाढलेले वजन कमी करण्यास मदत करते. तसेच तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

सामग्री

पाणी – 1 कप

दालचिनी – 1

वेलची – 2

लवंगा – 2

साखर – 1.5 टीस्पून

चहाची पाने – 2 टीस्पून

सफरचंद रस – 1 कप

 

कसे तयार करायचे

एका पॅनमध्ये पाणी, चहाची पाने, दालचिनी, लवंगा, साखर आणि वेलची घाला आणि 10-15 मिनिटे उकळू द्या. गॅस बंद करा आणि अशा प्रकारे चहा 3-4 मिनिटे सोडा. मिश्रण चाळून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर त्यात सफरचंदाचा रस घाला. आपल्या आवडीनुसार सफरचंद रस घाला. फ्रीजमध्ये काही तास थंड करा. सफरचंद काप आणि पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि थंडगार सर्व्ह करा. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

गरम पाण्यामध्ये एक लिंबू मिक्स करा आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे लिंबू पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. परंतु, लक्षात ठेवा आपण पीत असलेले पाणी गरम म्हणजेच अगदी उकळलेले असू नये, तर ते साधारण गरम म्हणजेच कोमट असावे. अशा पाण्याचे तुम्ही आरामदायक पद्धतीने सेवन करू शकता.

आपण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर आपण दररोज गरम पाण्याचे सेवन करू शकता. गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे चयापचय बळकट होते, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू मिसळून, ते पाणी प्यायल्याने आपले वजन देखील कमी होऊ शकते. दररोज गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे रक्त परिसंचरण सुरळीत होते, यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include these healthy drinks in your diet to lose weight)