
भाज्या खरेदी करताना आपण सहसा त्यांचा ताजेपणा आणि किंमतच पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की भाज्यांचा रंग आणि आकार यावरूनही त्यांचा स्वाद आणि पोषण किती आहे, हे समजू शकतं? बाजारात भाज्या निवडताना थोडं लक्ष देणं आवश्यक आहे. योग्य भाजी निवडली तर जेवणाचा स्वाद तर वाढतोच पण आरोग्यालाही फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया, कोणती भाजी कोणत्या कारणासाठी उत्तम आहे.
तीखट जेवण आवडणाऱ्यांसाठी तीन खड्डे असलेली शिमला मिर्च उत्तम आहे. यात तिखटपणा जास्त असतो आणि भाजी बनवण्यासाठी ही सर्वोत्तम मानली जाते. ही शिमला मिरची तेलात परतल्यावर त्याचा स्वाद आणि सुगंध जेवणाला वेगळीच चव देतो.
चार खड्डे असलेली शिमला मिरची ही हलकी गोड असते. त्यामुळे पिझ्झा, सँडविच आणि सलादसाठी ती उत्तम पर्याय आहे. यात तिखटपणा कमी असतो त्यामुळे हलक्या स्वादाच्या पदार्थांसाठी ती योग्य ठरते.
ज्यूस किंवा गाजराचा हलवा बनवायचा असेल तर गडद लाल रंगाचं गाजर निवडा. यात गोडवा जास्त असतो आणि रंगही छान दिसतो. गडद लाल रंगाच्या गाजरात बीटा-कॅरोटीनचं प्रमाणही जास्त असतं हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
नारंगी रंगाचं गाजर हे भाजी आणि सलादसाठी चांगलं आहे. याचा स्वाद हलका असतो आणि मीठ-लिंबू घालून खाल्ल्यास त्याची चव अप्रतिम लागते.
वांग्याचे भरीत करण्यासाठी गोल आकाराची वांगी घ्या. यात बिया कमी आणि गर जास्त असतो, त्यामुळे उत्तम स्वाद मिळतो. गोल वांग्यांचा वापर पारंपरिक भारतीय पदार्थांमध्ये जास्त होतो, कारण त्यांची चव तव्यावर भाजल्यावर खुलते.
आकाराने मोठी (लांब) वांगी ही भाजी बनवण्यासाठी उत्तम आहे. कापल्यानंतर ती लवकर शिजतात आणि चवीला छान लागतात. लांब वांग्यांचा वापर आंध्र आणि दक्षिण भारतीय शैलीतील भाज्यांमध्ये खूप होतो.
गडद हिरव्या रंगाची कोबी निवडल्यास त्यात चव, जीवनसत्त्वं आणि खनिजांचं प्रमाण जास्त मिळतं. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही ती फायदेशीर आहे. या कोबीत अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. लक्या हिरव्या रंगाची कोबी ही पोषक तत्त्वांच्या बाबतीत थोडी कमी असते आणि चवही हलकी असते. सलाद किंवा फास्ट फूडमध्ये ती जास्त पसंत केली जाते.